Monday, September 25, 2023

कधीही न रडणाऱ्या सुधा मूर्तींना ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने केले होते भावुक

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. त्यांना कोणी ओळखत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांचा साधेपणा नेहमीच मोठमोठ्या लोकांना आकर्षित करून घेतो. सुधाजींबद्दल अनेक माहिती आपल्याला माहित आहे. सुधाजींचे चित्रपटांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये त्यांनी चक्क एक सिनेमा बघताना त्यांना रडू कोसळल्याचे देखील सांगितले.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुधाजी यांनी आलिया भट्टच्या ‘राजी’ सिनेमाचे जोरदार कौतुक केले, सोबतच तिच्या अभिनयाबद्दल देखील तिच्यावर स्तुतीसुमने उधळली. सध्या आलिया भट्ट तिच्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या सिनेमामुळे कमालीची गाजत आहे. अशातच आता सुधाजी यांनी देखील तिचे कौतुक केल्यामुळे आलिया डबल गाजत असून ती देखील कमालीची खुश आहे.

एका मुलखतीमध्ये सुधा मूर्ती यांनी सांगितले की, चित्रपट बघणे आणि त्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत त्यावर चर्चा हे त्यांना खूपच पसंत आहे. त्या कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक आव्हान घेतले होते, ज्यात त्यांनी एक वर्षभर रोज एक सिनेमा पाहिला होता. त्यांनी हे देखील सांगितले की, त्या इंजिनियर नसत्या तर नक्कीच त्या चित्रपट समीक्षकच झाल्या असत्या. त्या राजी सिनेमा पाहायला गेल्या तेव्हा त्यांच्या सिनेमाकडून काही जास्त अपेक्षा नव्हत्या मात्र सिनेमा पाहिल्यानंतर त्या अक्षरशः रडल्या आणि आलियाच्या फॅन झाल्या. असे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल देखील सांगितले. त्या म्हणाल्या त्यांना दिलीप कुमार, राजेश खन्ना, ऋतिक रोशन, शाहरुख खान, अमीर खान पासून गडी आताच्या आयुष्यमान खुराणा, विकी कौशल पर्यंत सर्वांचेच काम आवडते.

अधिक वाचा –

“आपलं उत्तरदायित्व समजून…” अभिनेता हार्दिक जोशीने मुख्यमंत्रांच्या ‘त्या’ कृतीचे केले भरभरून कौतुक

…बंधनात अडकलो! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, फोटो झाले व्हायरल

हे देखील वाचा