सुनील शेट्टीच्या बिल्डिंगमध्ये डेल्टा वेरियंट?? पसरलेल्या बातम्यांवर अभिनेत्याने सोडलं मौन


संपूर्ण देशात अजूनही कोरोना विषाणूचा प्रभाव कायम आहे. त्यात कोरोनाचे वेगवेगळे वेरियंट देखील समोर आले आहेत. अशातच माहिती समोर आली आहे की, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या बिल्डिंगमध्ये डेल्टा वेरियंट मिळाल्याने त्याची बिल्डिंग सिल केली आहे. (Suniel Shetty denied the news of getting delta veriants in the bulding)

सोमवारी (१२जुलै) सकाळी ही बातमी आली की, मुंबईमधील पृथ्वी अपार्टमेंटमध्ये जिथे सुनील शेट्टी राहतो, तिथे कोव्हिड १९ च्या संक्रमणामुळे सिल केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बिल्डिंगमध्ये डेल्टा वेरियंट सापडला आहे. यावेळी सुनील शेट्टीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “सुनील शेट्टी शहराच्या बाहेर आहे आणि त्याचे कुटुंब देखील एकदम सुरक्षित आहे.” तसेच त्यांची बिल्डिंग सिल झाली आहे. ही बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच सुनीलने लोकांना सत्य सांगण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

सुनीलने ट्विटरवर एक पोस्ट करून लिहिले की, “माझी बिल्डिंग सुरक्षित आहे आणि माझे कुटुंब देखील ठीक आहे. एका विंगमध्ये नोटीस लावली आहे. पण बिल्डिंग सिल केल्याच्या बातमीत काहीच सत्यता नाहीये. माझी आई, पत्नी, अहान, अथिया, स्टाफ आणि संपूर्ण बिल्डिंग ठीक आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. सॉरी मित्रांनो कोणताही डेल्टा नाहीये. खोट्या बातम्या खूप वेगाने व्हायरल होत असतात. कृपया अशी दहशत पसरवू नका. माझ्या बिल्डिंग आणि सोसायटीमध्ये कोणताही डेल्टा वेरियंट नाहीये. फक्त एक कोव्हिड केस सापडली आहे त्याच्यावर देखील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.”

अशातच बीएमसीचे असिस्टंट कमिशनर प्रशांत गायकवाड यांनी सांगितले होते की, “कोव्हिडच्या काही केस समोर आल्याने बीएमसीने पृथ्वी अपार्टमेंट सिल केला आहे. सोबतच त्यांनी सांगितले होते की, सुनील शेट्टीचे कुटुंब एकदम सुरक्षित आहे.”

सुनील शेट्टी हा शेवटचा संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, इम्रान हाशमी, गुलशन ग्रोवर आणि काजल अग्रवाल महत्वाच्या भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या २३व्या वर्षी तुटलं होतं कृष्णा श्रॉफचं हृदय; टायगर श्रॉफच्या बहिणीला आली पहिल्या प्रेमाची आठवण

-भारती झालीय म्हातारी! तरीही हर्ष म्हणतोय, ‘प्रेम तर नेहमी तरुणच असते…’; व्हिडिओवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

-‘…माझ्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी’, म्हणत पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली सोनाली कुलकर्णी; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.