‘द हिडन बर्थडे व्हिडिओ’, म्हणत सनी लिओनीने केला तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर

Sunny Leone share her hidden birthday video on social media


अभिनेत्री सनी लिओनी ही आजकाल जास्त चित्रपटात दिसत नसली, तरी देखील सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या 40 व्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सनी लिओनीने 13 मेला तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिने तिचा एक फोटो शेअर केला होता. त्या वेळेस लॉकडाऊन चालू होते, त्यामुळे घरातील सदस्यांच्या उपस्थितीतच तिचा हा वाढदिवस साजरा केला होता. या व्हिडिओत सनी खूप मजेशीर अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओत तिच्या डोक्यावर पिवळ्या रंगाचे फुगे बांधलेले दिसत आहेत.यासोबतच ती काहीतरी बोलताना दिसत आहे. आता तिने हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “द हिडन बर्थडे व्हिडिओ.”

लॉकडाऊन दरम्यान सनी घरीच आहे, पण घरी असूनही तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन लागले होते, तेव्हाच सनी तिच्या परिवारासोबत अमेरिकेला गेली होती. त्यांनतर ती पुन्हा भारतात परत आली होती. परंतु या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करावे लागले.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागच्या वर्षी ‘बुलेट्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत होती. तसेच ती विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ या वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे. या सोबतच आणि मल्याळम चित्रपट ‘शिरो’ आणि तमिळ चित्रपट ‘विरमादेवी’ यामध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.