धनुष अन् साई पल्लवीच्या ‘या’ गाण्याने बनवला नवीन रेकॉर्ड; यूट्यूबवर मिळाले ५० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या चित्रपटातील गाणी नेहमीच धमाल करत असतात. यामध्ये रजनीकांत यांचा जावई आणि सुपरस्टार धनुषच्याही एका गाण्याचा समावेश आहे. धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवीच्या ‘मारी २’ या चित्रपटातील एका गाणे चांगलेच गाजत आहे. या गाण्याला आजही चाहत्यांची पसंती मिळत असून आता या गाण्याने एक विक्रमही बनवला आहे.

धनुष आणि पल्लवीच्या या गाण्याचे नाव ‘राउडी बेबी’ (Rowdy Baby) आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. खरं तर या जोडीच्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. मात्र, याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. (Superstar Dhanush And Sai Pallavi Song Rowdy Baby From Movie Maari 2 Got 5 Millions Likes On Youtube)

लाईक्सव्यतिरिक्त या व्हिडिओच्या व्ह्यूजबद्दल बोलायचं झालं, तर या गाण्याला आतापर्यंत १ अब्ज १८ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे पहिलेच गाणे बनले आहे, ज्याला यूट्यूबवर ५० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकाराच्या गाण्यावर चाहत्यांनी २ लाखांपेक्षाही अधिक कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर ‘मारी २’ चित्रपट २१ डिसेंबर, २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाला मोहन यांनी केले होते. सन २०१५ मध्ये आलेल्या ‘मारी’चा हा सिक्वल आहे. या चित्रपटात साई पल्लवी आणि धनुष यांच्याव्यतिरिक्त कृष्णा, तोविनो थॉमस, वरालक्ष्मी शरतकुमार आणि विद्या यांसारख्या कलाकारांचाही समावेश होता. चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धमाल केली होती. यासोबतच यातील गाणीही हिट झाली होती.

‘मारी २’मधील ‘राउडी बेबी’ गाण्याबाबत बोलायचं झालं, तर या गाण्याला युवान शंकर राजाने संगीत दिले होते. याचे बोल पोएटू धनुषने लिहिले होते. हे गाणे धनुष आणि धीने गायले हते. या धमाकेदार गाण्यावरील डान्स प्रभूदेवाने कोरिओग्राफ केले होते.

या गाण्यात साई पल्लवीचा बिंधास्त अंदाज पाहायला मिळाला होता. पल्लवी कठीण स्टेप्सही खूप सोप्या पद्धतीने करते. त्यामुळेच धनुष आणि पल्लवीचा हा डान्स नंबर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.