‘रात्रीची शूटिंग, मॅगी आणि मी’, स्वरा भास्करचा सेटवर चोरून मॅगी खातानाचा व्हिडिओ व्हायरल


बॉलिवूडमधील अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. कधी कधी या अभिनेत्री त्यांच्या या पोस्टमुळे विविध वाद देखील ओढवून घेत असतात. सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत वादांमध्ये अडकणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात वर येणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वरा तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियामुळेच प्रकाशझोतात असते. सोशल मीडियावर आपले परखड मते मांडणारी स्वरा फक्त विवादित पोस्टचा सोशल मीडियावर शेअर करते असे अनेकांना वाटते. मात्र स्वरा अनेक मजेशीर पोस्ट देखील शेअर करत असते. तिने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये स्वरा रात्रीच्या अंधारात चोरून मॅगीचा आस्वाद घेताना दिसत आहे. अशा पद्धतीने मॅगी खाण्याचे कारण सांगताना व्हिडिओमध्ये स्वरा म्हणाली, “मी दोन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे आणि आता मी मॅगी खात आहे. पुढे ती म्हणते की मी मॅगीशिवाय नाईट शिफ्टचे शूटिंग करुच शकत नाही. निर्मात्यांनी मला नाही पहिले ना” असे देखील ती म्हणताना दिसली.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “कारण आम्हाला लाज वाटत नाही! रात्रीची शूटिंग, मॅगी आणि मी, हे केल्यामुळे मला काही वाटतं नाही. माझे ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट किंवा निर्मात्यांना आणि स्टायलिस्टला कोणीही सांगू नका”

स्वराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून, काहींनी या व्हिडिओमध्ये देखील तिला ट्रोल करण्याचे कारण शोधून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी स्वराचा हा व्हिडिओ पाहून अनेक भन्नाट कमेंट्स करत तिची मजा घेतली आहे.

स्वरा चालू घडामोडी मग त्या राजकीय असो, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ आदी कोणत्याही क्षेत्रातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर स्पष्ट आणि ठोस मतं मांडत असते. अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारणाऱ्या स्वराने बऱ्याच वेबसिरीजमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘शीर कोरमा’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ‘जाहां चार यार’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत

 


Leave A Reply

Your email address will not be published.