काय सांगता! तापसीने केला होता ‘आयर्न मॅन’ला मेसेज, पण आला नाही रिप्लाय; म्हणाली, ‘मला त्यांच्यापेक्षा अधिक…’


सौंदर्यासोबतच प्रतिभावान आणि जिवंत अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. साऊथ सिनेसृष्टीतून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आलेल्या तापसीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचे देखील मन जिंकले. बऱ्याचदा पठडीबाहेरील चित्रपटांमध्ये दिसणारी तापसी मागील काही काळापासून कंगना रणौत आणि रंगोली चंदेल यांच्यासोबतच्या शाब्दिक वादांमुळे सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. शिवाय नुकताच तिचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन प्रसंगीचा एक व्हिडिओ नेटफिल्क्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तापसीने तिचे एक गुपीत सांगितले आहे.

अनेक फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकारांना सोशल मीडियावर सतत मेसेज करत असतात. मात्र, कलाकार त्यांच्या व्यस्त दैनंदिन जीवनामुळे मेसेज कधीच बघत नाहीत. पण एखादा कलाकार जर फॅनसारखा त्याच्या आवडत्या कलाकाराला सारखा मेसेज करत असेल तर? याच संदर्भातले एक गुपीत तापसीने नुकतेच सांगितले आहे.

तापसीने मागे देखील तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिने सांगितले आहे की, “मी आयर्न मॅन रॉबर्ट डाउनी ज्युनिअरची खूप मोठी फॅन आहे. त्यांना अनेक मेसेजस देखील पाठवत असते. सतत मेसेज पाठवूनही अजून मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय आला नाही. मला त्यांच्यापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.” मात्र, यादरम्यान तिने हे सांगितले नाही की, तिने रॉबर्टला कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज केला होता? तापसी आणि रॉबर्ट दोघेही इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहेत.

‘हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी नेटफिल्क्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती आणि विक्रांत मेसी एक मजेशीर गेम खेळताना दिसत असून त्यांच्याजवळ खोटे बोलणे पकडणारे एक मशीन देखील आहे. हे दोघं एकमेकांना प्रश्न विचारतात आणि कोणी खोटे बोलले, तर ती मशीन जोरात वाजते.

तापसीचा नुकताच ‘हसीन दिलरुबा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला समीक्षकांकडून सरासरी प्रतिसाद मिळाला. काहींनी तर या सिनेमासोबत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडच्या ‘द टुमॉरो वॉर’ जास्त चांगला असल्याचे सांगितले. यावर तापसीने चिडत एक ट्वीट देखील केले आणि म्हटले, “सर हॉलिवूड आहे ना, सर्व काही चालते. चुकांचा विचार न करता देखील आपण महत्वाकांक्षी आहोत. इथे आम्ही कितीही प्रयोग केले, तरीही कमीच आहे आणि त्यांना आम्ही बेईमान वाटतो. कदाचित एलएच्या बाहेर काम केल्यावर काही मदत होईल.”

आगामी काळात ती ‘लूप लपेटा’, ‘दोबारा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठू’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.