TMKOC: अर्रर्र! ‘हा’ लाडका कलाकार घेणार शोमधून निरोप, चाहत्यांमध्ये पुन्हा निराशा


सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltaah chashmah) या मालिकेने सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. या‌‌ मालिकेची लोकप्रियता देखील खूप आहे. प्रेक्षकांनी तर या मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. टीआरपीच्या यादीत या मालिकेने नेहमीच उच्च स्थान मिळवले आहे. या मालिकेतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे नशीब बदलले आहे. नवीन कलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांची जागा बनवली. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच ही मालिका खूप आनंदाने पाहतात. यातील जेठालालचा मुलगा टप्पूचे पात्र सगळ्यांना माहितच आहे. अनेकांना हे पात्र खूप आवडते. परंतु अशातच अशी माहिती हाती आली आहे की, तो या मालिकेतून निरोप घेणार आहे.

जेठालालच्या मुलाचे पात्र निभावणारा अभिनेता राज अनादकट या मालिकेतून बाहेर जाणार आहे. त्याची राहिलेली शूटिंग तो लवकरच पूर्ण करून ही मालिका सोडणार आहे. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. (Taarak Mehta ka ooltah chashma actor raj anadkat quit show)

हाती आलेल्या माहितीनुसार, टप्पू म्हणजेच राज अनादकट मागील अनेक दिवसांपासून हा शो सोडण्याचा विचार करत होता. याबाबत त्याने प्रोडक्शन हाऊससोबत देखील बातचीत केली आहे. शेवटी त्याने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी २०१७ मध्ये या मालिकेतील टप्पूला रिप्लेस केले होते. त्याची जागा राज अनादकटने घेतली. याशिवाय नेहा मेहता, गुरू चरण सिंग यांसारख्या कलाकारांनी देखील या मालिकेतून निरोप घेतला आहे. त्यांच्या जागी नवीन चेहरे देखील आले. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील टप्पू हे पात्र दुसऱ्यांदा रिल्पेस होणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ मधील सगळे कलाकार ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या सेटवर आले आहे. त्यांनी सगळ्यांनी मिळून अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप मजा मस्ती केली. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!