‘तारक मेहता…’ फेम निधी भानुशाली निघाली रोड ट्रीपवर; मुंबई ते लडाखपर्यंत जाण्यासाठी केली नवीन कार खरेदी


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांची खूप आवडती आहे. या मालिकेचे यश म्हणजे या मालिकेतील पात्र. या मालिकेतील सोनू हे पात्र निभावणारी अभिनेत्री म्हणजे निधी भानुशाली. निधीने जुन्या सोनूचे पात्र निभावले आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच साहसी आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी ती तिच्या मित्रांसोबत आणि कुत्र्यासोबत रोड ट्रीपला गेली आहे. माध्यमांशी बोलताना तिची आई पुष्पा भानुशालीने सांगितले की, तिची ही रोड ट्रीप 2- 3 महिने चालू शकते.

पुष्पा यांनी सांगितले की, “निधी खूपच साहसी आहे. तिला नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. एक आठवड्यापूर्वी ती तिच्या मित्रांसोबत आणि कुत्र्यासोबत रोड ट्रीपला गेली आहे. तिचा मुंबईपासून लडाखपर्यंत जाण्याचा प्लॅन आहे. या प्रवासात ती महाराष्ट्रातील डहाणू भागात आणि काही भागात थांबली होती. त्यांनतर ती गुजरातकडे गेली. पुढे जाऊन ते लोक गुजरात आणि उत्तरेकडील राज्यातून हिमाचलकडे जाणार आहेत. या ट्रीप दरम्यान ती अनेक व्हिडिओ बनवून तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करणार आहे. निधीला दिग्दर्शनाची देखील खूप आवड आहे. या व्हिडिओ शूटिंग दरम्यान ती तिची आवड पूर्ण करणार आहे.”

निधीच्या आईने पुढे सांगितले की, “निधी तिच्या कुत्र्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. यामुळेच ती त्याला तिच्या सोबत घेऊन गेली आहे. तिने मला आश्वासन दिले आहे की, ती त्याची पूर्ण काळजी घेईल आणि त्याला सांभाळेल. या ट्रीपसाठी तिला 2- 3 महिने लागू शकतात.”

निधीने तिच्या या ट्रीपसाठी नवीन कार खरेदी केली आहे. याबाबत पुष्पा यांनी सांगितले की, “निधीला तिच्या या ट्रीपमध्ये तिची जुनी कार घेऊन जायचे नव्हते. त्यामुळे तिने नवीन होंडा डब्ल्यु आरव्ही ही कार खरेदी केली आहे. खरं‌‌ सांगायचं, तर निधीने जेव्हा सुरुवातीला तिच्या या ट्रीपबद्दल सांगितले, तेव्हा मला खूप टेन्शन आले होते. परंतु मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास होता. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका सोडल्यानंतर अशा 5-6 साहसी ट्रीप केल्या आहेत. परंतु ही तिची सर्वात लांब ट्रीप होणार आहे. माझे तिच्यासोबत रोज बोलणे होत असते.”

निधीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत उत्कृष्ट अभिनय करून तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. यानंतर ती नावारूपाला आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.