TMKOC: कोण घेणार नट्टू काकांची जागा? घनश्याम नायक यांच्या बदलीबाबत असित मोदींनी सोडले मौन


सोनी सब टीव्हीच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील प्रत्येक पात्र या शोचे प्राण आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शोमधील प्रत्येक पात्राचे स्वतःचे महत्त्व आहे. या शोमध्ये अनेक वर्षे आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. कर्करोगग्रस्त घनश्याम नायक यांनी चाहत्यांना निरोप दिला. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, लवकरच त्यांच्या जागी शोमध्ये कोणी नवीन कलाकार येणार आहे.

नट्टू काकांच्या जागी काही कलाकारांची नावेही समोर आली आहेत. मात्र, आता शोचे निर्माते असित मोदी यांनी नट्टू काकांच्या बदलीबाबत मौन सोडले आहे. असित मोदी म्हणतात की, नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांच्या जागी दुसरा कलाकार शोधण्याचा त्यांचा अद्याप कोणताही विचार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, असित मोदी आणि त्यांच्या टीमकडे दुसरे नट्टू काका शोधण्याची अशी कोणतीही योजना नाही. (taarak mehta ka ooltah chashmah producer asit kumar modi revelead we are not planning to replace nattu kaka)

असित मोदी म्हणाले की, “ज्येष्ठ अभिनेत्याला जाऊन फक्त एक महिनाच झाला आहे. नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक हे मित्र होते आणि मी त्यांच्यासोबत बरीच वर्षे काम केले. त्यांनी शोला दिलेल्या पाठिंब्याचे मी कौतुक करतो. आत्तापर्यंत, त्यांची भूमिका बदलण्याचा किंवा नट्टू काकांच्या भूमिकेत इतर कोणत्याही अभिनेत्याला कास्ट करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबद्दल आधीच अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी अशा अफवांवर लक्ष देऊ नये.”

घनश्याम नायक यांची आठवण काढत असित मोदी म्हणाले की, “त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. यानंतर ते अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये दिसले.” मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील नट्टू काका या व्यक्तिरेखेवरून त्यांना खरी ओळख मिळाली, जे जेठालाल गडा यांच्या दुकानात हिशोबाचे काम पाहत असायचे. या शोमध्ये नट्टू काकांची व्यक्तिरेखा खूप पसंत केली गेली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिवसा पूजा केली जाते, तर रात्री महिलांवर…’, वादग्रस्त विधानानंतर कॉमेडियन वीर दासने दिले स्पष्टीकरण

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-बायकोची प्रगती बघवेना, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून पत्नीला मारहाण; कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल


Latest Post

error: Content is protected !!