Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड अंबानींच्या पार्टीत हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या नातवाने केला ‘हाय रे अल्ला’ गाण्यावर बॅकग्राऊंड डान्स; व्हिडिओ पाहाच

अंबानींच्या पार्टीत हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या नातवाने केला ‘हाय रे अल्ला’ गाण्यावर बॅकग्राऊंड डान्स; व्हिडिओ पाहाच

गेल्या दोन महिन्यांपासूनच मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व कार्यक्रम चालू आहे. या आधी त्यांचे दोन फंक्शन झालेले आहेत. आणि आता त्यांच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे राजकारणातील ही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संगीत सोहळ्याला हजेरी लावलेली होती.

अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी देखील हजेरी लावलेली होती. संगीत सोहळ्यामध्ये सगळ्यात बॉलीवूड कलाकारांनी त्यांचे डान्स कौशल्य दाखवले. याचबरोबर आपण कधीही न पाहिलेला तेजस ठाकरे यांचा डान्स देखील आपल्याला या संगीत सोहळ्यात पाहायला मिळालेला आहे.

अंबानींच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरे यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स केलेला आहे. यावेळी स्टेजवर अनेक बॉलीवूड कलाकार समोर नाचत होते. आणि तेजस ठाकरे मात्र या कलाकारांच्या मागे डान्स करत होता. सगळेजण ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘ये लडकी हाय अल्ला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तेजस ठाकरे देखील या गाण्यावर चांगलेच ठुमके लावत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fashiv Sena (@fashivsenaofficial)

 

तेजस ठाकरे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर टीका करत आहेत. हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांचा नातू चक्क ‘यह लडकी हाय अल्ला’या गाण्यावर डान्स करत आहे. म्हणून त्याला अनेकजण ट्रोल देखील करत आहेत. तेजस ठाकरे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

घटस्फोट आणि भूतकाळाबद्दल श्वेता तिवारीने मांडले दुःख; म्हणाली, ‘प्रत्येक वेळी प्रेमात विश्वासघात…’
सलमान खानच्या घरावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, नऊ आरोपींवर आरोपपत्र दाखल

 

हे देखील वाचा