Friday, March 29, 2024

धक्कादायक| वयाच्या २६ व्या वर्षी तेलुगू अभिनेत्री गायत्रीचे अपघातात दु:खद निधन

सध्या देशभरात सगळीकडे होळी आणि रंगपंचमीच्या सणांची गडबड सुरू असताना तेलुगू चित्रपट जगतातून एक धक्कादायक बातमी आली आहे. तेलुगू चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री(Gayatri) म्हणजेच डॉली डी क्रूजचे (Dolly Dcruz) कार अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. या बातमीने सध्या तेलुगू चित्रपट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या प्रतिभावान अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी याबद्दल सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे.  

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, २६ वर्षीय अभिनेत्री गायत्री शुक्रवारी (१९,मार्च) ला होळीचा सण साजरा करुन तिच्या मित्रासोबत गाडीतून घराकडे येत होती. या प्रवासादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हाडरवर धडकली, या धडकेने अभिनेत्री गायत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात हैद्राबादमधील गच्चीबोली परिसरात झाला आहे. यामध्ये गायत्रीच्या मित्राचाही मृत्यू झाला आहे, या घटनेने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी अपघातात आणखी एका महिलेचाही मृत्यू झाल्याचीही बातमी समोर आली आहे. गायत्रीने मॅडम सर मॅडम अंन्ते या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये काम केले आहे. या सिरीजमधील गायत्रीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

तत्पूर्वी, अभिनेत्री गायत्री तिच्या चित्रपटांइतकीच युट्यूब चॅनेलवर प्रचंड लोकप्रिय होती. ती सोशल मिडियावरही नेहमी सक्रिय असायची. यावरुन ती तिचे बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करायची. गायत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग होता, ज्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. गायत्रीने अनेक शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे.

दरम्यान गायत्रीच्या मृत्यूची बातमी तिची मैत्रिण आणि अभिनेत्री सुरेखा वाणीने शेअर केला आहे. यामध्ये तिने “तू आम्हाला इतक्या लवकर कसे सोडून जाऊ शकतेस, आपण सोबत असताना खूप छान क्षण घालवले आहेत. मला अजुनही विश्वास बसत नाही, तू पून्हा परत ये, आपण सोबत पार्टी करु, तुला खूप काही सांगायचे आहे, तुझ्यावर कायम प्रेम राहील,” अशा शब्दात तिने आपले दुःख व्यक्त केले आहे. सुरेखाच्या या भावूक पोस्टने सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

‘समाजात फूट पाडणारे चित्रपट टाळायला हवे’, वाचा काश्मिर फाईल्स चित्रपटाबाबत काय बोलले शरद पवार

तर ‘या’ कारणामुळे डिंपल कपाडिया यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतरही राजेश खन्नांना नव्हता दिला घटस्फोट

करण जोहरच्या विश्वासामुळे राणी मुखर्जी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आवाजाने दिली नवी ओळख

 

 

हे देखील वाचा