‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या पाहूण्याचे आगमन; अपारशक्ती खुराणाचाही आहे यादीत समावेश


सध्या सिनेसृष्टीतून आनंदाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. कोणी रेशीमगाठीत अडकले आहेत, तर कोणाच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे स्वागत करण्यात आले आहे. शिवाय काही असेही कलाकारमंडळी आहेत, जे लवकरच आई-बाबा बनणार आहेत. यावर्षी बॉलिवूड क्षेत्रातील अनेक अभिनेत्री आई झाल्या आहेत. करीना कपूर खान, अनुष्का शर्मा आणि दिया मिर्झा या सारख्या अभिनेत्रींना यावर्षी मातृत्व लाभले आहे. अशाच इतरही काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या घरात यंदा पाहुणे येणार आहेत.

नेहा धुपिया

बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘रोडीज’ची न्यायाधीश नेहा धुपिया यावर्षी दुसर्‍यांदा आई होणार आहे. या आधी अभिनेत्री आणि तिचा पती अंगद यांनी एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्यामध्ये नेहाचा बेबी बंप स्पष्ट दिसून आला आहे.

किश्वर मर्चंट

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ स्पर्धक किश्वर मर्चंट यावर्षी प्रथमच आई होणार आहे. अभिनेत्री सतत तिच्या गरोदरपणाचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे (डोहाळे जेवण) फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पोस्टमध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिची प्रसुती ऑगस्टमध्ये होणार आहे. किश्वर आणि सुयश ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भेटले, तेथून त्यांचे नाते सुरू झाले आणि शो सोडल्यानंतर दोघांचे लग्न झाले. (these bollywood celebs in 2021 will welcome little angels)

एवलिन शर्मा

एवलिन शर्माला ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात आपण पाहिले आहे. तिने लग्नानंतर काही महिन्यातच तिची गरोदरपणाची घोषणा केली आणि सर्वांना चकित केले. या घोषणेदरम्यान शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा बेबी बंपही स्पष्टपणे दिसत आहे.

अपारशक्ती खुराणा

‘दंगल’ आणि ‘पति पत्नी और वो’ सारख्या चित्रपटात दिसणारा अपारशक्ती खुराना लवकरच वडील होणार आहे. अभिनेत्याने आपल्या पत्नी आक्रितीच्या गरोदरपणाची मजेदार असे घोषणा करताना लिहिले होते की, “जर लॉकडाऊनमध्ये काम वाढवता आले नाही, तर आम्हाला वाटते की केवळ कुटुंब वाढेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


Leave A Reply

Your email address will not be published.