काय डान्स केलाय पोरींनी! गुरु रंधावाच्या गाण्यावर मुलींचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

These Girl Dance On Guru Randhawa Song Baby Girl Video Went Viral


बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांची गाणी ही जबरदस्त हिट झालेली आपण पाहिली आहेत. त्यामध्ये हनी सिंग, बादशाह यांसारख्या अनेकांचा समावेश आहे. यामधीलच एक गायक म्हणजे ‘गुरु रंधावा’. गुरुने आपल्या आवाजाने बॉलिवूडमध्ये धमाल केली आहे. त्याचे ‘बेबी गर्ल’ हे गाणे चाहत्यांना भलतेच आवडले होते. आजही हे गाणे आपल्याला ऐकायला मिळतेच मिळते. इतकेच नाही, तर या गाण्यावरील बरेच डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. असाच एक व्हिडिओ आता सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तीन मुली जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे मुव्ह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या गाण्यात कनिष्क नावाची मुलगी आपल्या टीमसोबत ‘बेबी गर्ल’ या गाण्यावर थिरकत आहे. कनिष्क टॅलेंट हब या चॅनेलने यूट्यूबवर शेअर केलेल्या या डान्स व्हिडिओला आतापर्यंत ४० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याचसोबत या व्हिडिओवर कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ती नेहमीच प्रत्येक प्रसिद्ध गाण्यावर डान्स करून आपले व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असते.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही थांग पत्ता नसतो. हे सर्व नेटकऱ्यांच्या हातात असतात. त्यांना जे आवडतं, ते व्हायरल होण्यास थोडाही वेळ लागत नाही. सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जे प्रतिभावान व्यक्तींसाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे यांसारखेच अनेक व्हिडिओ सहजरीत्या जगभरात व्हायरल होताना दिसत आहेत.

असाच एका ६२ वर्षीय आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यांचा व्हिडिओ गायक दिलजीत दोसांजनेही आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

या व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान जी…’, राखी सावंतच्या कँसरग्रस्त आईचा ‘भाईजान’साठी भावुक मेसेज; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.