अभिनय क्षेत्र म्हणा किंवा मनोरंजन क्षेत्र, इतकंच काय तर रोजच्याच आपल्या आयुष्यात लूक्स, भाषा, देहबोली या गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो. सौंदर्याबद्दल बोलायचं म्हटलं तरी याच गोष्टी सर्वात पहिल्यांदा मनात येतात. विशेषत: लूक्सला तर जास्त महत्त्व दिले जाते. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी सौंदर्याची व्याख्या बदलण्यात महत्त्वाचे योगदान दिले किंवा असं म्हणता येईल की ज्यांनी झिरो फिगर ट्रेंड मोडला. आपल्या या व्हिडिओचा विषयही हाच आहे मंडळी, तर चला पाहू मराठीतील अशा कोणत्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी झिरो फिगर महत्त्वाची नाही, तर अंगातील कलागुण महत्त्वाचे असतात हे सर्वांनाच दाखवून दिलंय.
आता विषय असा आहे म्हणजे पहिलं नाव निर्मिती सावंत यांचं पहिलं येतं. काही दिवसांपूर्वीच झिम्मा चित्रपटातून निर्मिती सावंत प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. त्यातही त्यांना ओळख मिळवून दिली ती २००४-२००६ दरम्यान चाललेल्या कुमारी गंगुबाई नॉन-मॅट्रिक या मालिकेने. त्यानंतर त्यांच्या करियरने प्रगतीची गाडी पकडली जी आजही चांगलीच धावत आहे. यादरम्यान निर्मिती सावंत यांनी लूक्स पेक्षाही तुमचं काम महत्त्वाचं असल्याचं दाखवून दिलंय.
कॉमेडी शो किंवा एखादी विनोदी भूमिका म्हणलं की पटकन स्नेहल शिदम, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार डोळ्यासमोर येतात ना. त्यांनी त्यांच्या विनोदाच्या कौशल्यांनी सर्वांना खळखळून हसायला भाग पाडलं. यात कधीही त्यांच्या लूक्स किंवा फिगरमध्ये आली नाही. उलट त्यांच्या कामाचंच कौतुक जास्त होत असतं. त्यांनी केवळ विनोदी भूमिकाच केल्या असंही नाही. त्यांनाही त्यांच्या करियरमध्ये विविध भूमिका साकारायला मिळाल्या, त्यातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडली. स्नेहल शिदमने चला हवा येऊ द्याबरोबरच भागो मोहन प्यारे, माझा होशील ना अशा मालिकांमध्येही काम केलंय. तर आरती सोळंकी बिग बॉस सारख्या रिऍलिटी शोमध्ये झळकली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून सर्वांना हसवणाऱ्या विशाखा सुभेदारलाही प्रेक्षकांनी विविध भूमिकेत अनेकदा पाहिलं आहे. पण अनेकांना हे माहित नसेल की ती एक चांगली डान्सरही आहे.
हेही पाहा- वजनात सौंदर्य मोजायचं नसतं हेच या मराठी अभिनेत्रींनी दाखवून दिलंय
वनिता खरात देखील या यादीत येते बरं का. टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये ओळखीचं नाव असलेल्या वनिता खरातनेही आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर छाप पाडली आहे. तिने कबीर सिंगमध्ये केलेली भूमिका सर्वांच्यात लक्षात राहिली, तसेच तिच्या विनोदाच्या टाईमिंगचेही अनेकदा कौतुक होत असते.
मालिकांमधून आपली ओळख निर्माण केलेल्या अन्विता फलटणकर आणि अक्षया नाईक या अभिनेत्रींचाही या यादीत समावेश आहे. या दोघींनीही घराघरात तुमच्यातील कलागुण, स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो, हा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला. अन्विताने येऊ कशी तशी मी नादांयला आणि अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली. अन्विताने यापूर्वी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
केवळ मराठीत नाही, तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही झिरो फिगर ट्रेंड मोडणाऱ्या काही अभिनेत्री आहेत, ज्यात भारती सिंग, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा अशा काही अभिनेत्रींची नावं नक्कीच येतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-