टायगर श्रॉफ अन् दिशा पटानीमध्ये रंगला फुटबॉलचा सामना; व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ


अनेक बॉलिवूड कलाकार खेळ खेळताना दिसत असतात. ते खेळाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातील लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. अनेक कलाकार फुटबॉल खेळताना दिसतात. अशातच टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी फुटबॉल खेळताना दिसले आहेत. तसं पाहायला गेलं, तर या दोन कलाकारांना अनेक वेळा एकत्र स्पॉट केले आहे. परंतु या वेळेस ते दोघे फुटबॉल खेळताना दिसले आहेत. फुटबॉल खेळताना त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. याआधी टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी त्याच्या आणि दिशा पटानीच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला होता. (Tiger Shroff and disha patani’s football playing video viral on social media)

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा हा व्हिडिओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टायगर आणि दिशा एकत्र फुटबॉल खेळत आहेत. या व्हिडिओमध्ये ते दोघे खूप मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये दिशाने शॉर्ट्स आणि फिटेड जॅकेट घातले आहे, तर टायगर श्रॉफने सॅंडो आणि ट्राऊझर  घातले आहे. त्यांची ही केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

त्यांचे चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. यासोबतच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर दिसत आहेत.

टायगर आणि दिशा अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांना एकदा रस्त्यावर पोलिसांनी पकडले होते. तसेच त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर दिशाच्या वाढदिवशी देखील त्यांनी एकत्र वाढदिवस साजरा केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.