याचवर्षी येणार ‘तूफान!’ थिएटरमध्ये नव्हे, तर ओटीटीवर होणार रिलीझ

toofan will not be seen in theaters farhan akhtar film will be released on ott platform


लॉकडाऊनमुळे बरेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात आले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजूनही चित्रपटांच्या प्रदर्शनाची प्रक्रिया सुरुच आहे. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’, तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे अभिनित फिल्म ‘हसीन दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर रिलीझ होणार आहेत. यासोबतच आणखी एक चित्रपट रिलीझ होणार आहे, तो चित्रपट म्हणजेच ‘तूफान’ होय.

‘तूफान’ या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर दिसणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘तूफान’चा फर्स्ट लूक यापूर्वीच चाहत्यांसमोर आला होता. यात फरहान अख्तर एका बॉक्सरच्या लूकमध्ये दिसला होता. ‘तूफान’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. म्हणजेच ‘तूफान’ यापुढे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी देखील सुरू झाली आहे.

माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फरहान अख्तरचा ‘तूफान’ हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ऍमेझॉन प्राईमने या चित्रपटाचे अधिकार मिळवले आहेत. यानंतर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले गेले. थिएटरमध्ये नव्हे तर ऍमेझॉन प्राईमवर चाहत्यांना हा स्पोर्ट्स बॅकग्राउंड चित्रपट पाहता येईल.

माध्यमांतील बातमीनुसार, चाहत्यांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘तूफान’ मे महिन्यात ऍमेझॉन प्राईमवर रिलीझ होईल. अद्याप रिलीझ डेट विषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहण्याचे स्वप्न पाहणारे फरहानचे चाहते या वृत्तामुळे निराश होऊ शकतात.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अख्तर बॉक्सिंग रिंगमध्ये दिसला होता. त्याने हातात बॉक्सिंग ग्लोव्हजही घातले होते. त्याच्या या लूकमुळे चाहतेही स्पोर्ट्स ड्रामा फिल्म पाहण्यास उत्सुक आहेत. गेल्या वर्षी हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे त्याची रिलीझची डेट पुढे ढकलण्यात आली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने केले तारुण्यातील सुंदर फोटो शेअर, होतायत जोरदार व्हायरल

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.