हॉलिवूड अन् बॉलिवूडसह या चित्रपटसृष्टींचाही आहे जगात दबदबा! जाणून घ्या जगातील टॉप- १० सर्वोत्कृष्ट चित्रपट उद्योगांबद्दल

Top 10 film industries of the world including bollywood hollywood cinema of china and cinema of united kingdom


असे म्हणतात की, नवव्या शतकापासूनच जगात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा परिस्थितीत, २० व्या शतकात चित्रपटसृष्टीने बरेच काही विकसित केले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चित्रपट हे करमणुकीचे साधन असले, तरीही बर्‍याच अंशी त्याचा परिणाम समाजावरही होतो. प्रेक्षकांना चांगला कंटेंट दिल्याबद्दल कौतुक केले जाते आणि तो चित्रपट युगानुयुगे लक्षात राहतो. बहुतेक सर्व देशांमध्ये चित्रपटांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सर्वत्र एक वेगळी संस्था स्थापन केली गेली आहे. फक्त भारतातच १० हून अधिक फिल्म बोर्ड आहेत. आज आपण जगातील १० सर्वोत्कृष्ट फिल्म बोर्डांबद्दल जाणून घेऊया.

हॉलिवूड
‘हॉलिवूड’ हा अमेरिकेचा फिल्म बोर्ड आहे. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमधील एका जिल्ह्याचे नाव याला देण्यात आले आहे. हॉलिवूडची स्थापना १९०३ मध्ये झाली होती. तसेच, १९०८ मध्ये त्याचा ‘काउंट ऑफ मोंटे क्रिस्तो’ हा पहिला चित्रपट रिलीझ झाला होता. हॉलिवूड आज जगातील सर्वाधिक कमाई करणारा बोर्ड आहे. सायन्स फिक्शन आणि अ‍ॅक्शन चित्रपटांमुळे जगभरात याचे नाव आहे.

सिनेमा ऑफ चायना
‘सिनेमा ऑफ चायना’ ही जगातील सर्वात जुनी फिल्म संस्था मानली जाते. याची सुरुवात १८९६ मध्ये झाली होती. तर, १९०५ मध्ये याचा ‘डिंगजुन माउंटन’ हा पहिला चित्रपट बनला होता. १९३० चे दशक हे सुवर्ण कालखंड म्हणून ओळखले जाते. यावर्षी या उद्योगात अनेक बदल पाहायला मिळाले. २०१६ च्या आकडेवारीनुसार, चीनकडे ४१ हजाराहून अधिक चित्रपटगृह आहेत. चिनी सिनेमामध्ये बनविलेले चित्रपट जगभरात प्रसिद्ध आहेत. आज ही सिनेमा संस्था हॉलिवूडला स्पर्धा देत आहे.

बॉलिवूड
कमाईच्या बाबतीत ‘बॉलिवूड’ तिसऱ्या स्थानावर आहे, परंतु चित्रपट निर्मितीच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. एका वर्षभरात इतर चित्रपटसृष्टींपेक्षा, बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट निर्माण होतात. याची स्थापना १९०० च्या सुमारास झाली होती. तसेच, १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक मुकपट होता. बॉलिवूडचा पहिला बोललेला चित्रपट ‘आलम आरा’ होता. हिंदी चित्रपटसृष्टीने त्याच्या १०० वर्षात खूप विकास केला आहे.

सिनेमा ऑफ जपान
आधुनिकीकरणाच्या बाबतीत जपान देशाला टक्करच नाही. त्याचबरोबर याचा फिल्म बोर्डही चांगली कामगिरी करत आहे. ‘सिनेमा ऑफ जपान’ हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. चित्रपट निर्मितीच्या बाबतीत हा जगातील चौथा मोठा उद्योग आहे. जपानमध्ये १८९७ पासून चित्रपट निर्मिती केली जात आहे.

सिनेमा ऑफ द युनायटेड किंगडम
‘सिनेमा ऑफ द युनायटेड किंगडम’ हे विसाव्या शतकामधील सर्वोत्कृष्ट चित्रपट उद्योगातील एक आहे. ब्रिटिश सिनेमानेच जगाला ‘हॅरी पॉटर’ आणि ‘जेम्स बाँड’ सारखे चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही चित्रपट ब्रिटिश सिनेमाचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट आहेत.

सिनेमा ऑफ साऊथ कोरिया
‘सिनेमा ऑफ साऊथ कोरिया’ सन १९४५ पासून चित्रपट बनवत आहे. विसावे शतक दक्षिण कोरियासाठी चांगले मानले जाते. यावेळी इंडस्ट्रीने ‘द हाऊसमेड’ सारखे चित्रपट दिले. गेल्या दोन दशकांत या संस्थेने बरीच प्रगती केली आहे. याचा परिणाम म्हणून, इथले कलाकार हॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसू लागले आहेत.

सिनेमा ऑफ फ्रांस
‘सिनेमा ऑफ फ्रांस’ जगातील सर्वात मोठ्या उद्योगांमधील एक आहे. सुरुवातीच्या काळात या उद्योगाला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला, परंतु नंतर सरकारच्या पाठिंब्याने याने स्वत: ची स्थापना केली. जगभरातील कलाकार इथे काम करतात. २०१८ मध्ये या उद्योगाने २५८ वैशिष्ट्यीकृत चित्रपटांची निर्मिती केली. १८९५ मध्ये इथे पहिला चित्रपट रिलीझ केला गेला.

सिनेमा ऑफ जर्मनी
‘सिनेमा ऑफ जर्मनी’ चित्रपटाचा इतिहास बराच जुना आहे. इथले चित्रपट जगभर प्रसिद्ध होते. अगदी हिटलरनेही याचा फायदा घेतला होता. तथापि, ‘सिनेमा ऑफ जर्मनी’ची सुरुवात १९९५ मध्ये झाली आणि ‘बारबरा’ आणि ‘द अमेरिकन फ्रेंड’ हे चित्रपट इथल्या प्रमुख चित्रपटांपैकी एक आहेत.

सिनेमा ऑफ नायजेरिया
‘सिनेमा ऑफ नायजेरियन’ला नॉलिवूड म्हणूनही ओळखले जाते. याची सुरुवात १९ शतकाच्या अखेरीस झाली होती. इथेही मोठ्या प्रमाणात चित्रपटांची निर्मिती केली जाते.

सिनेमा ऑफ सिंगापूर
‘सिनेमा ऑफ सिंगापूर’ १९६५ पासून अस्तित्वात आहे, परंतु १९९० पासून त्याचा पुनर्जन्म झाल्याचे मानले जाते. १९९२ मध्ये इथे पहिला चित्रपट ‘मीडियम रेअर’ रिलीझ झाला होता. या चित्रपटाला बराच पैसा लावला गेला, पण बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी होऊ शकला नाही. २००६ पासून या उद्योगात कमाईच्या बाबतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिषेक बच्चनला सर्वात जास्त वाटते आईची भीती; अशा दिसतात सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत ‘या’ कलाकरांच्या आई

-सुरुवातीला बालकलाकार म्हणून मिळाली नव्हती ओळख, नाकारली होती तब्बल २ कोटींची जाहिरात, वाचा साई पल्लवीबद्दल रंजक गोष्टी

-एकेकाळी भाडे देण्यासाठी नव्हते विजयकडे पैसे, आज आहे करोडो रुपयांचा मालक, ‘या’ कारणामुळे विकला होता पहिला फिल्मफेअर अवॉर्ड


Leave A Reply

Your email address will not be published.