Sunday, June 14, 2026
Home बॉलीवूड दयाबेनने हातात मुलाला धरून व्यक्त केल्या वेदना, पाहा कुणी केली ही वाईट अवस्था…

दयाबेनने हातात मुलाला धरून व्यक्त केल्या वेदना, पाहा कुणी केली ही वाईट अवस्था…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांना खूप हसवत आहे. शोमधील प्रत्येक पात्राने आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. दयाबेन ही या शोमधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे, जीची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी हिने साकारून आणखी मजेदार बनवली हाेती. ती बर्याच काळापासून या शोचा भाग नाही, परंतु तिचे चाहते मालिकेमध्ये तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दिशा वाकाणी शोमध्ये परतणार की नाही? हे माहीत नाही, पण तिचा एक व्हिडिओ चाहत्यांना आणि प्रेक्षकांना धक्का देत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिशा वकानी (disha vakani) एका मुलाला मांडीवर घेऊन तिची वेदनादायक कथा सांगत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीचे अश्रू थांबतच नाहीत. सगळ्यांना पाेट धरून हसवणारी दयाबेन उर्फ ​​दिशा वाकानी हिला अश्या परिस्थितीत पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahila Mandal (@tmkocxladies)

हा व्हायरल व्हिडिओ 2008 मध्ये रिलीज झालेल्या ‘सी कंपनी’ या चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये दिशा वाकाणीला एक छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ती इतकी प्रसिद्ध नव्हती, त्यामुळे तिच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. चित्रपटाच्या या छोट्या क्लिपमध्ये तुषार कपूर एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे आणि दिशा वाकानीची वेदनादायक कथा जगाला सांगत आहे. ‘सी कंपनी’ या चित्रपटात तुषार कपूरशिवाय अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील कलाकारांनी चित्रपट, शो, म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये देखील खूप काम केले आहे, परंतु फार कमी लोकांचे त्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेले. दिशा वकानी हिने देखील टीव्ही मालिके आधी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु तिला खरी लोकप्रियता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधूनच मिळाली.(tv `show taarak mehta ka ooltah chashmah dayaben actre`s`s disha vakani expressing grieve while holding child film c kkompany video going viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘फोर मोअर शॉट्स’ फेम मानवीने केला साखरपुडा, प्रसिद्ध कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत लवकरच होणार ‘या’ नवीन पात्राची एन्ट्री

हे देखील वाचा