Friday, January 3, 2025
Home टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या लोकप्रियतेचा असा घेतला जातोय फायदा? कुटूंबाकडून करण्यात आली ‘ही’ विनंती

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या लोकप्रियतेचा असा घेतला जातोय फायदा? कुटूंबाकडून करण्यात आली ‘ही’ विनंती

बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth shukla ) मृत्यूने प्रत्येकालाच धक्का दिला होता. या प्रतिभावान आणि हरहुन्नरी कलाकाराने घेतलेली अशी अवेळी एक्झिट प्रत्येकालाच चटका लावून घेतली होती. भलेही सिद्धार्थ शुक्ला जगात नसेल, पण त्याचे चाहते आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. सिद्धार्थचे काही प्रोजेक्ट्स अपूर्ण राहिले होते, त्यातील एक गाणे होते ‘जीना जरूरी है’. या गाण्यात ‘बिग बॉस’ (bigg boss) स्पर्धक विशाल कोटियन आणि अभिनेत्री दीपिका त्रिपाठी यांनी सिद्धार्थसोबत काम केले आहे. या गाण्याच्या निर्मात्याने सिद्धार्थच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय हे गाणे रिलीज केले आहे आणि लोकप्रियतेसाठी सिद्धार्थचे नाव वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.यावरुनच सिद्धार्थचे चाहते चांगलेच संतापले आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या एका चाहत्याने सिद्धार्थच्या कुटुंबाने दिलेल्या अधिकृत निवेदनाची एक प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत या चाहत्याने यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे आणि या गाण्याबाबत विशेष विनंती करण्यात आली आहे. सिद्धार्थ शुक्लाला त्याच्या लाडक्या कुटुंबातील आणि जवळच्या लोकांपेक्षा कोण जास्त ओळखते. तरीही तुम्ही त्याच्या विरोधात जात असाल तर मी तुमच्या विरोधात आहे, सिद्धार्थच्या निवडीचा आदर करा आणि सिद्धार्थ शुक्ला वापरणे बंद करा,” अशा कडक शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

तर आणखी एका नेटकऱ्याने “या म्युझिक व्हिडिओमध्ये सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लाज वाटली पाहिजे. तुमच्याकडे इतर प्रोजेक्ट्स करायला वेळ होता पण तुम्ही हा मार्ग निवडला कारण तुम्ही सिद्धार्थ शुक्लाचे नाव वापरले नाही तर फुटेज कसे मिळणार ? नाही का” असे म्हणत या गोष्टीचा निशेष व्यक्त केला आहे त्याचसोबत सिद्धार्थ शुक्लाचे नाव न वापरण्याचीही या चाहत्याने विनंती केली आहे. त्यामुळेच हे प्रकरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ शुक्लाचा ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 चा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘धन्यवाद आठवणी ताज्या केल्याबद्दल’

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा एसटीमधील जुना फोटो शेअर करून सांगितला अनुभव

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा