तर ‘यामुळे’ वीरेंद्र सेहवागने आरतीशी केले लग्न, कारण ऐकुन तुमच्याही उंचावतील भुवया


छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ आजवर या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे हा शो पाहण्यासाठी विदेशातील प्रेक्षक देखील हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शोच्या एपिसोडमध्ये माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफने हजेरी लावली होती.

कपिल शर्मा नेहमीप्रमाणे हसत-हसत शोची सुरुवात करतो. या शोचा जसा जसा पुढे जाऊ लागतो, तसे-तसे मजेशीर किस्से समोर येत आहेत. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग यांनी लग्न का केले, याविषयी कपिल बोलताना दिसला.

कपिल शर्मा शोमध्ये जे कोणी पाहुणे येतात, त्यांची नेहमीच खिल्ली उडवत असतो. यावेळी कपिल म्हणाला की, “वीरेंद्र सेहवाग एकदा बोलले होते की, मी आणि माझे सहकारी युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी अशा मुलींशी लग्न केले, ज्यामुळे आमचे इंग्रजी सुधारले जाऊ शकते.” यावर वीरेंद्र सेहवाग म्हणतो, “या क्रिकेटर्सपैकी एक कपिल देव देखील आहे.” हे ऐकून उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक हसू लागतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफसह अनेक सहकार्‍यांनी हा व्हिडिओ शेअर केला. त्याचवेळी, कपिल क्रिकेटपटूंना म्हणताना दिसला की, “हा शो २०१३ला सूरू झाला आहे. मग तुम्ही इतक्या उशिरा का आलात?” यानंतर मोहम्मद कपिलसोबत धमाल करताना दिसला. कपिल मोहम्मदला म्हणाला की, “तुम्हाला शोमध्ये सहभागी होण्याचा मार्ग माहिती नव्हता का? तुम्हाला कोणी याबद्दल सांगितले नव्हते का, की तुम्ही खूप लोकप्रिय आहात, तुम्ही या शोमध्ये सहभागी होऊ शकता.”

कपिलला प्रतिउत्तर देताना मोहम्मद म्हणाला की, “कपिलचा शो हिट होण्यापूर्वीपासूनच मी त्याला ओळखतो. शो लोकप्रिय झाल्यानंतरही आम्ही भेटलो आणि गप्पाही मारल्या आहेत. पण मला त्याने शोमध्ये कधीच बोलावले नाही.” यावर वीरेंद्र म्हणाला की, “चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे.” शो दरम्यान, वीरेंद्रही कपिलची टिंगल करताना दिसला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य


Leave A Reply

Your email address will not be published.