‘इंडियन आयडल १२’च्या सेटवर उदित नारायण यांनी शनमुखप्रियाला म्हटले आपली मुलगी; तिच्यासाठी गायलं खास गाणं

Udit Narayan sing special song for Shanmukhpriya, she get emotional


टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल 12’ हा शो सध्या खूप प्रसिद्ध आहे. या शोमध्ये नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. या शोच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये ‘सिंग अलॉंग’ ही थीम असणार आहे. या निमित्त शोमधील पाहुणे उदित नारायण आणि अभिजित भट्टाचार्य हे स्पर्धकांसोबत मिळून काही प्रसिद्ध गाणी गाणार आहे. जेव्हा शनमुखप्रिया जेव्हा तिचे गाणे गाते, तेव्हा उदित नारायण तिला म्हणतात की, त्यांचा मुलगा आदित्य नारायण तुला बहीण म्हणतो. म्हणजे ते नात्याने तिचे वडील झाले.

आदित्य आणि शनमुखप्रिया यांच्यातील नात्याला पाहून उदित नारायण त्यांचे प्रसिद्ध ‘पापा कहते बेटा बडा नाम करेगा’ हे गाणे बदलून ‘पापा कहते हैं बेटी बडा नाम करेगी’ हे गाणे गातात.

उदित नारायण यांचे हे गाणे ऐकून शनमुखप्रिया म्हणते की, “उदितजी तुमच्या या गाण्याने मी खूपच भावुक झाले आहे. मी खरंच स्वतःला खूप नशीबवान समजते की, आदित्य नारायणकडून मला एवढे प्रेम आणि सपोर्ट मिळाला. मी त्याला आदित्य भैया म्हणते. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही.”

या आधीच्या एपिसोडमध्ये आदित्य नारायणने शनमुखप्रियाला त्याची बहिणी मानली होती. त्यांनतर तो जेव्हा केव्हा तिला स्टेजवर बोलवतो, तेव्हा तो तिचा उल्लेख बहीण असाच करतो.

या एपिसोडमध्ये एकीकडे उदित नारायण यांनी शनमुखप्रियाला त्यांची मुलगी मानली, तर दुसरीकडे अभिजीतने अरुणिताला एक सरप्राईझ दिले. अरुणिताचा परफॉर्मन्स झाल्यावर अभिजीत तिचे कौतुक करतो आणि तिला रसगुल्ला भरवतो. हे बघून अरुणिता खूप खुश होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.