Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन तू छपरी आहेस, तू सडकछाप आहेस ! आपल्या नव्या सिरीज मधून उर्फी देणार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर …

तू छपरी आहेस, तू सडकछाप आहेस ! आपल्या नव्या सिरीज मधून उर्फी देणार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर …

सोशल मिडीयावर कायम चर्चेत असलेली उर्फी जावेद आता एका नव्या सिरीज मध्ये दिसणार आहे. उर्फी तिच्या निरनिराळ्या लुक्स साठी सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. अनेकजण तिला ट्रोल देखील करतात. पण उर्फीला त्याने काहीही फरक पडत नाही. पण उर्फी इथवर कशी आली. तिचा प्रवास काय होता, याविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे. 

आता उर्फिचा हा प्रवास या नव्या सिरीज मधून बघायला मिळणार आहे. उर्फिने नुकतीच सोशल मिडीयावर याबाबत घोषणा केली आहे. या सिरीजचं नाव आहे ‘फॉलो कर लो यार’. यात आपल्याला तिचा आजवरचा प्रवास विस्तारितपणे बघता येईल. या पोस्ट सोबत उर्फिने लिहिलंय की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला खूप काही माहिती आहे. तर तुम्ही भ्रमात आहात ! तुम्ही अजून काहीच नाही पाहिलंय.या व्हीडीओत   

या व्हीडीओ मध्ये उर्फी म्हणतेय कि, लोक म्हणतात कि मला अटेन्शन हवंय, म्हणून मी असे अतरंगी कपडे घालत नाटक करते. लोक म्हणतात तू छपरी आहेस, तू सडकछाप आहेस.खरं म्हणतात लोक. जळतात सगळे. त्यांना माझी सफलता बघवत नाही. हि एक समस्याच आहे. 

खरी उर्फी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्राईम व्हीडीओवर फॉलो कर लो यार नक्की बघा असंही उर्फी यावेळी म्हणाली, या सिरीजचं दिग्दर्शन संदीप कुकरेजा यांनी केलं आहे. तर फजीला अल्लाना आणि कामना मेनेजेस यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे.     

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

त्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब जातो ! सोशल मिडीयावरच्या ट्रोलिंग विषयी बोलली मलाईका अरोरा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा