खरंच की काय! डान्स करताना इतकी गुंग झाली उर्वशी रौतेला, कॅमेऱ्यासमोरच काढून फेकला टॉप


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या बोल्ड अदांनी अनेकदा इंटरनेटला हादरवून टाकते. ती एका परफेक्ट फिगरची मालकीण आहे आणि याचा पुरावा ती सतत तिच्या इंस्टाग्रामवर देत असते. उर्वशी ज्याप्रमाणे सुंदर आहे, त्याचप्रमाणे ती एक उत्तम डान्सर देखील आहे. पण एकदा तिला डान्ससाठी एवढा जोश आला की, तिने कॅमेऱ्यासमोर तिचे कपडे काढून फेकून दिले.

उर्वशीचा व्हिडिओ
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण कधी-कधी ती असे व्हिडिओही शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागते. उर्वशीने काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल. (urvashi rautela removed her top in front of camera video gone viral)

डान्स करता करताच काढला टॉप
हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसतेय. उर्वशी डान्स करताना अचानक तिचा टी-शर्ट काढते. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या ‘बिजली की तार’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर याने गायले असून, ते उर्वशीवर चित्रीत करण्यात आले आहे.

उर्वशीचे चित्रपट
आपल्या सेक्सी आणि किलर लूकमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. याशिवाय उर्वशीकडे आगामी काळात अनेक मोठे चित्रपटही आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!