×

कहरच! उर्वशीने बाथरूममध्ये आरशासमोर दाखवल्या अदा, बोल्ड लूक पाहून चाहत्यांना फुटला घाम

आपल्या अभिनयापेक्षा बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच उर्वशीने तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. हा बाथरूम मिरर सेल्फी आहे. या सेल्फीतील उर्वशीची अदा अगदी पाहण्यासारखी आहे.

दाखवल्या कातिलाना अदा!
शेअर केलेल्या या लेटेस्ट फोटोमध्ये उर्वशी रौतेला ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या मिरर सेल्फीमध्ये उर्वशीने लाल स्कर्टसोबत लाल रंगाची बिकिनी घातली आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री मोकळ्या केसांमध्ये आणि साध्या मेकअपमध्ये कमाल दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

नुकताच कापला होता केक
उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये उर्वशी सोनेरी रंगाच्या तलवारीने केक कापताना दिसली. व्हिडिओमध्ये ती मोठ्या मेहनतीने केक कापताना दिसली. तसेच गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमधली अभिनेत्रीची मनमोहक स्टाइल नेटकऱ्यांना चांगलीच भावली. व्हिडिओ शेअर करताना उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येक केकची एक खास गोष्ट असते. हा आयुष्यातील एक सुंदर क्षण आहे. पहिल्या नजरेतील प्रेम.”

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

उर्वशीचे चित्रपट
उर्वशी रौतेलाने ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती सनी देओल सोबत दिसली होती, ज्यामध्ये तिचे काम खूप पसंत केले होते. याशिवाय तिने ‘लव्ह डोस’, ‘लाल दुपट्टा’, ‘बिजली की तार’, ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘डूब गए’ आणि ‘वो चांद कहाँ से लाओही’ असे अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. उर्वशी रौतेला लवकरच ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

Latest Post