प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला पुर्णविराम!! थरारक अन् रहस्यमयी ‘असुर २’ची शूटिंग झाली सुरू; अमेय वाघने दिली माहिती


कोरोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहेत. मोठमोठे कलाकार देखील वेब सिरीजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. म्हणूनच प्रेक्षकांकडूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटला विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वेब चित्रपट असो वा वेबसिरीज, यांची लोकप्रियता तर या दिवसांत शिगेला पोहचत आहे.

अशा लोकप्रिय वेबसिरीजपैकीच एक आहे अर्शद वारसी अभिनित ‘असुर’. मागच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये रिलीझ झालेल्या या सिरीजला तूफान लोकप्रियता मिळाली. सस्पेन्सने भरपूर अर्थातच रहस्यमय आणि थरारक अशा या वेब सिरीजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ही सिरीज संपल्यापासून रसिकांना याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती. मात्र आता नुकताच समोर आलेल्या फोटो पाहून असं लक्षात येतंय की, याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळा अमेय वाघ पहिल्या भागाप्रमाणे या भागामध्येही महत्वाची भूमिका साकारत आहे. नुकताच त्याने ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुमच्याही लक्षात येईल की, याच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू झालं आहे. अमेयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये, तो हातात क्लिपबोर्ड घेऊन उभा दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने, शूटिंग सुरू झाल्याचं सांगितलं आहे. (very famous webseries asurs second part asur 2 shooting start today amey wagh share picture on set see photo)

‘असुर’च्या पहिल्या सीझनमध्ये अर्शद वारसीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच अभिनेता अमेय वाघ आणि अरुण सोबतीने महत्त्वाच्या असणाऱ्या सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. रंजक कथानक, अनेक गूढ, वेगवेगळी रहस्ये आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय, एकंदरीत यामुळे पहिला सीझन प्रचंड हिट ठरला. आता येणारा नवा सीझन आणखी काय रहस्ये घेऊन येणार, हे पाहणे कमालीचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.