Thursday, July 18, 2024

अय्याे! ईशान अन् सिद्धांतच्या डान्सवर कॅटरीना खुदू-खुदू हसली, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कॅफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी ‘फोन भूत‘ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप धमाल केली. कॅटरिनाला डान्स शिकवण्यापासून ते तिच्यासाेबत गाण्यांवर डान्स करण्यापर्यंत या तिन्ही स्टार्सनी सेटवर मस्त वेळ घालवला. व्हिडिओमध्ये हे तिघे ‘फोन भूत’च्या सेटवर मस्ती करताना आणि भांगडा करताना दिसत आहेत.

कॅटरिना कॅफ (katrina kaif) हिला हसवण्यात या दोन्ही कलाकारांनी कोणतीही कसर सोडली नाही. ईशान (ishaan khattar) आणि सिद्धांत (siddhant chaturvedi) याच्या ब्रोमान्समध्ये तुम्ही कॅटरिनाला बघू शकता. डान्स रिहर्सलमधून घामाघूम होऊनही ती स्वत:ला चांगली कॅरी करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

हा व्हिडिओ कॅटरिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव करत आहेत.

ईशानने सांगितला शूटिंग दरम्यानचा अनुभव
‘कॉफी विथ करण’च्या 7व्या सीझनमध्ये कॅटरिनासोबत काम करण्याबाबत ईशान आणि सिद्धांत बोलले होते. दोघांनी कबूल केले की, “सेटवर कॅटरिना सर्वात मजेदार व्यक्ती होती” आणि जेव्हा ती पहिल्यांदा सेटवर पोहोचली तेव्हा देखील काय घडले हे त्यांनी शेअर केले. ईशान म्हणाला होता की, “मी सेटवर कॅटरिनासोबत घालवलेला वेळ मला चांगला आठवतो. आम्ही शूटिंग करत होतो आणि त्यानंतर जेव्हा कॅटरिना सेटवर आली तेव्हा सेटचे वातावरणच बदलून गेले.” ईशान पुढे म्हणाला की, ‘आम्हला सेटवर कॅटरिनाच्या आगमनाची कुजबुज ऐकू आली. कॅटरिना येणार आहे कळल्यावर सगळेच रोमांचित झाले होते. आम्ही विचार करत होतो की, इथे काय चालले आहे?”

‘फोन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
दिग्दर्शित गुरमीत सिंग यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘खलनायक’च्या रिमेकमध्ये रणवीरने भूमिका साकारू नये’, जाणून घ्या ‘संजू बाबा’ असे का म्हणाला

‘परदेस’मध्ये सलमान अन् माधुरीला करायचं होतं काम, पण ऐन मोक्यावर सुभाष घईनं घातला रोडा

हे देखील वाचा