Thursday, September 28, 2023

विशाखा सुभेदाराच्या लव्ह मॅरेजला होता घरच्यांचा नकार; म्हणाली, ‘मला १५ दिवस कोंडून ठेवले होते’

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. तिने अनेक मालिका विरोधी कार्यक्रम तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्यामुळे तीच प्रेक्षकांची लाडकी देखील केलेली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेत होती घराघरात पोहोचली. आजकाल विशाखा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या रील्स व्हिडिओ फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच विशाखाची एक मुलाखत झाली त्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाचा अनुभव तसेच तिची लव स्टोरी देखील शेअर केली आहे.

विशाखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखती तिच्या लवस्टोरी बद्दल सांगितले. तिने सांगितले की, “लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला दादा म्हणायची काकस्पर्श या नाटकामुळे आमची भेट झाली या नाटकाचा तो असिस्टंट दिग्दर्शक होता तेव्हा मी लहान होते त्याने मला एक दिवस तू मला दादा म्हणू नको असं सांगितलं काळजी करणारा प्रेम करणारा माणूस प्रत्येक बायकांना हवा असतो तेव्हा आर्थिक गणित डोक्यात नसतात त्याचं काळजी करणं प्रेम करणं आवडायला लागले आणि मी हो म्हणाले.”

पुढे विशाखा म्हणाली की, “आमच्या लग्नाला आई-वडिलांकडून विरोध होता. माझ्या वडिलांना मी नाटकात काम केलेलेच आवडत नव्हते, तर नाटकात काम करणाऱ्या माणसाशी लग्न करण्यात. त्यांना कसे आवडेल मग आजीने आई-वडिलांना सांगितलं. तिच्या क्षेत्रात काम करणारा माणूस तिला भेटला आहे तर तुम्ही कशाला अडवताय. आजीमुळे माझ्या लग्नाला होकार दिला पण लग्नाआधी त्यांची मुलगी टीव्ही दिसली पाहिजे. अशी अट वडिलांनी ठेवली पाहिजे आणि तो शब्द माझ्या नवऱ्याने देखील पाळला. आमची लव स्टोरी पण कमाल होती. घरी कळल्यानंतर पंधरा दिवस आई माझ्याशी बोलत नव्हती. तिने मला कोणी ठेवलेलं परंतु फुल एक दुजे के लिए” असं तिने पुढे म्हटले.

विशाखा सध्या स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे याआधी तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
वयाच्या १८ व्या वर्षी तुटले होते सुनिधी चौहानचे लग्न; म्हणाली, ‘मी खूप चुका केल्या परंतु…’
शाहरुख आणि संजयने जी भूमिका नाकारली, त्याच भूमिकेने चमकले अरबाज खानचे करिअर

हे देखील वाचा