मुंबई पोलीसांनी दाखवला इंगा! हेल्मेट-मास्कला फाटा देत गाडी चालवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याकडून फाडले चलन


व्हॅलेंटाईन डेनिमित्त विवेक ओबेरॉय पत्नी प्रियांका अल्वाला रोमँटिक बाईक राईडवर घेऊन गेला होता. त्याचा हा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. तसेच दोघांनी मास्क देखील घातले नव्हते. परिणामी रस्त्यावर हेल्मेट न घेता दुचाकी चालविल्याच्या आरोपाखाली मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी विवेकला 500 रुपये दंड ठोठावला.

विवेक ओबेरॉय याच्यावर कोरोना गाईडलाईन्स तोडल्याचाही आरोप आहे. दुचाकी चालवताना विवेक आणि प्रियांका दोघांनीही मास्क घातले नव्हते. महाराष्ट्र कोविड -19 आणि मोटार वाहन कायद्याविरूद्ध सावधगिरीच्या उपाययोजना तसेच आयपीसीच्या कलम 188 (प्रशासनाने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन) आणि कलम 269 नुसार त्याच्यावर एफआयआर नोंदविली गेली आहे.

विवेक ओबेरॉयने या कारवाईवरमजेदार  एक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “प्रेम आम्हाला कोणत्या वळणावर घेऊन आले. मी आणि माझी पत्नी एका नवीन बाईक वर निघालो. हेल्मेटशिवाय होतो म्हणून चलन फाडले गेले. हेल्मेटशिवाय फिरताय? मुंबई पोलिस चेकमेट करतील. सुरक्षितता नेहमीच सर्वात महत्वाची असते हे सांगण्याबद्दल ‘मुंबई पोलिस’ तुमचे आभार. सुरक्षित राहा. हेल्मेट आणि मास्क घाला”.

14 फेब्रुवारी रोजी विवेक ओबेरॉयने हा व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर लिहिले की, “हॅपी व्हॅलेंटाईन डे. या सुंदर व्हॅलेंटाईन डेची सुरूवात, मी, माझी पत्नी आणि तिच्यासोबत”.

विवेकचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याला सूचना दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, “सर, हेल्मेट कुठे आहे? सुरक्षा अगोदर.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहले, “पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वार व्हाल तेव्हा हेल्मेट घाला.” एका वापरकर्त्याने लिहिले, “आता काही ज्ञानी लोक ज्ञान देतील आणि त्वरित ट्रॅफिक पोलिस बनून विचारतील हेल्मेट कुठे आहे? खरोखर विवेक भैय्या हेल्मेट कुठे आहे?”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.