बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ८०-९० च्या दशकातील प्रचंड लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीने ‘दयावन’, ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ इत्यादी बर्याच हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, माधुरीच्या संपूर्ण चित्रपट कारकीर्दीत ‘दयावान’ हा एकच असा चित्रपट होता, ज्यामध्ये तिने इतके बोल्ड सीन्स दिले की, तिला अक्षरशः प्रेक्षकांच्या टीकेचा सामना करावा लागला.
या चित्रपटात विनोद खन्नाने माधुरीसोबत बरेच बोल्ड सीन दिले होते. फिरोज खान यांनी हा चित्रपट बनविला होता. असे म्हटले जाते की जेव्हा माधुरीला हे समजले की, तिने यात बरेच बोल्ड सीन दिले आहेत आणि याचा थेट परिणाम तिच्या प्रतिमेवर पडेल, तेव्हा ती फिरोज खानपर्यंत पोहोचली.
त्याकाळी माध्यमात आलेल्या वृत्तांनुसार, माधुरीने फिरोज खान यांना चित्रपटातील बोल्ड सीन काढून टाकण्याची विनंती केली होती. मात्र, फिरोज खान माधुरीला स्पष्टपणे सांगितले की, “तुला १ कोटी रुपये यासाठीच मिळाले आहेत, अन्यथा अभिनेत्रीला इतके पैसे कोण देईल?” त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीला १ कोटी रुपये मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. तसेच, त्याच बोल्ड सीनसह हा चित्रपट रिलीझ करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, असे सीन्स दिल्याबद्दल माधुरीला बऱ्याच काळापर्यंत खंत होती.
सन १९८८ साली रिलीझ झालेला ‘दयावान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र, यातील बोल्ड सीनमुळे याला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला. माधुरी दीक्षित, विनोद खन्ना यांच्या व्यतिरिक्त आदित्य पंचोली आणि स्वतः दिग्दर्शक फिरोज खान देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नवलंच म्हणायचं अन् काय! ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानमुळे अभिनेत्रीने दिवसभर धुतले नव्हते आपले हात
-‘माझ्या वॉचमॅन आणि ड्रायव्हरने मला…’, न्यूड व्हिडिओ लीकवर उघडपणे बोलली राधिका आपटे
-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान










