Friday, March 29, 2024

जेव्हा राजेश खन्ना आणि शबाना आझमी एकत्र शूटिंग करायचे, तेव्हा कादर खान स्टुडिओत बसून…

हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या लुक्सची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची जादू प्रेक्षकांवर तर लावलीच सोबतच इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींवर अशी काही चालवली की, सर्वच अभिनेत्रींना राजेश खन्ना यांच्यासोबत काम करायची इच्छा असायची. त्यांचा चार्म तरुणीचं काय तर अभिनेत्रींवर देखील खूप होता. राजेश खन्ना यांच्यासोबत काम करताना अभिनेत्रींना प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळायची. याचा त्यांच्या करिअरला देखील मोठा फायदा व्हायचा. शिवाय राजेश खन्ना यांचे सिनेमे तुफान हिट होत होते, त्यामुळे यश देखील मिळायचे. राजेश खन्ना यांच्यासोबत एक तरी सिनेमा करायला मिळावी ही प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असायची.

सत्तरच्या दशकात आपल्या प्रचंड मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर राजेश खन्ना यांनी चाहत्यांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले आहे. आजही अनेक चाहते त्यांच्या चित्रपटांवरील किस्से शेअर करत असतात. अभिनेते राजेश यांच्या अभिनयावर फक्त चाहतेच नाही, तर अनेक अभिनेत्रीही फिदा होत्या. त्या काळात राजेश खन्नांसोबत काम करण म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासारखे असायचे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी यशाचा इतिहासच घडवला आहे. त्यांनी स्वतःसोबत अनेक अभिनेत्रींना यशाच्या शिखरावर नेले होते.

दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांना राजेश यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. शबाना आझमी ‘आर्ट’ चित्रपटांमुळे खूप प्रसिद्ध झाल्या होती. परंतु यानंतर राजेश खन्ना यांच्यासोबतचा ‘नसीहत’ या चित्रपटातील शबाना आझमी यांचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही हैराण व्हाल. राजेश आणि शबाना यांनी ‘अमरदीप’, ‘अवतार’, ‘अशांत’, ‘थोडी सी बेवफाई’ आणि ‘नसीहत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असले, तरीही ‘नसीहत’मध्ये दोघांची जोडी जबरदस्त गाजली होती. शबाना यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी एक रोचक किस्सा सांगितला होता.

‘नसीहत’ चित्रपट तब्बल ४ वर्षीनी प्रदर्शित झाला
प्रसिद्ध दिग्दर्शक अरविंद सेन यांचा ‘नसीहत’ चित्रपट १९८६साली प्रदर्शित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट १९८२ साली बनवण्यात आला, पण तो ४ वर्षांनी प्रदर्शित झाला. जेव्हा चित्रपट चित्रपटगृहात पोहोचला, तेव्हा प्रचंड हिट झाला. या चित्रपटाने सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. दरम्यान, प्रत्येक चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक आंबट आणि गोड आठवणी आहेत, अशाच काही आठवणी शबाना यांनी शेअर केल्या होत्या.

तंत्रज्ञानाने चित्रपट बनवणे केले सोपे
आज जरी तंत्रज्ञानाची प्रगत झाली असली, तरी जुन्या काळात चित्रपट शूट करणे सोपे नव्हते. आजच्या युगात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा गाण्यांचे रेकॉर्डिंग, तंत्रज्ञान प्रत्येकामध्ये आश्चर्यकारक आहे. पूर्वी अभिनेत्यांसह, चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना खूप कष्ट घ्यावे लागायचे, त्यानंतर एक चित्रपट तयार केला जायचा. शबाना आझमी यांनीही अशीच एक कथा सांगितली होती.

राजेश आणि शबाना यांनी शूटिंग करत असताना कादर खान यांनी लिहिली स्क्रिप्ट
शबाना आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “आता चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी योग्य कॉल शिट्स आहेत, पण पूर्वीच्या काळात तसे नव्हते. मला आठवते जेव्हा राजेश खन्ना आणि मी अरविंद सेनच्या ‘नसीहत’ चित्रपटासाठी खारमध्ये एकत्र शूट करत होतो, तेव्हा कादर खान आरके स्टुडिओमध्ये बसून पुढचा सीन लिहित असत आणि दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंगही करत असत. चित्रपटाची सत्यता सांभाळू शकलो हे एका आमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही.”

राजेश खन्ना आणि शबाना आझमी व्यतिरिक्त, ‘नसीहत’मध्ये कादर खान, मिथुन चक्रवर्ती आणि दीप्ती नवल यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘झनक-झनक झांझर बाजे’, ‘मेरा मन देखे सपना’, ‘तेरे मेरे प्यार की कुंडली’ ही गाणीही खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीत दिले होते.

हेही वाचा :

रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले झाले ‘तिकीट टू फिनाले’मधून बाहेर, घरातील सदस्यांनी दिला निर्णय

‘राजनीती’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखा बिष्टने बंगाली चित्रपटसृष्टी देखील कमावले आहे नाव, जाणून घ्या माहिती

शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू

हे देखील वाचा