काय सांगता! १५ व्यक्तींसमोर ‘या’ अभिनेत्रीने दिला होता ‘न्यूड’ सीन, अभिनय सोडून देण्याचा केला होता विचार

When South Film Actress Amala Paul Did Nude Scene For Film Aadai


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ‘अमला पॉल’ हे एक गाजलेले नाव आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी काही ना काही पोस्ट करत असते. अमला ही तिच्या ‘अदाई’ या चित्रपटामुळे देखील खूपच लोकप्रिय झाली. कारण या चित्रपटात अमलाने ‘न्यूड सीन’ देऊन सगळ्या प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. सन 2019 मधील जुलै महिनात अमला एकदमच सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. अमलाने ‘अदाई’ या चित्रपटात एक न्यूड सीन दिला होता, त्यामुळे ती 2019 मध्ये खूपच चर्चेत आली होती.

या चित्रपटात अमलाने एका अशा मुलीचं पात्र निभावलं होत की, जी रात्री नशेत बेधुंद होऊन जात असे. अमला पॉलने सांगितले की, ती जेव्हा हा न्यूड सीन देत होती त्यावेळी या चित्रपटाच्या सेटवर जवळ पास 15 व्यक्ती उपस्थित होते.

अमलाने सांगितले की, “मी या सीनसाठी खूपच घाबरले होते. मला माहित होते की, सेटवर काय काय होणार आहे आणि त्यावेळी तिथे कोण कोण उपस्थित असणार आहेत. मला घाबरलेली बघून या चित्रपटाचे दिग्दर्शित ‘रत्ना कुमार’ यांनी मला सांगितले की, तू या सीनमध्ये एक स्पेशल कॉस्च्युम घालू शकते. पण मी विदाऊट कॉस्च्युम तो सीन करून दाखवला.”

अमलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अमलाने आपल्या करिअरची सुरुवात मल्याळम ‘नीलमथारा’ यात एक सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. तो एक ब्लॉकमास्टर हिट चित्रपट होता. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारण्यात ती यशस्वी झाली. अदाई या चित्रपटासाठी ती सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आले होते.

अमला जेव्हा आपले सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत असे, तेव्हा काही क्षणातच ते सोशल मीडियावर व्हायरल होत असे. अमलाला प्रेक्षक इंटरनेट सेंसेशन असं संबोधतात. तसेच ती लवकरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील निदर्शनास येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.