Saturday, September 30, 2023

अर्रर्र! गाणं गाताना प्रियांकाच्या नवऱ्याचा गेला तोल अन् प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला- लगेच पाहा Video

हॉलिवूड स्टार आणि अमेरिकन गायक निक जोनास सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनास जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशात त्यांचे खूप मोठे नाव आहे. ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राशी लग्न केल्यानंतर त्यांची लोकप्रियता भारतात आणखी वाढली. निक जोनास ‘जोनास ब्रदर्स’ बँड अंतर्गत अनेक अल्बम जारी करत आहे. नुकताच न्यूयॉर्कमध्ये त्यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी रात्री अमेरिकेत जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टदरम्यान निक जोनास स्टेजवर कोसळला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये, गायक निक (Nick Jonas Videos) त्याचा भाऊ केविन जोनास आणि जो जोनास यांच्यासोबत परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी तो अचानक खाली पडला. व्हिडिओमध्ये निक जोनास पांढरा शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. तो आपल्या भावांसोबत गाणे म्हणत असताना स्टेजवर अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. मात्र, त्याने त्याकडे लक्ष दिले नाही, उठून आपले काम सुरूच ठेवले. त्याच्या या स्टाईलवर चाहते फिदा झाले.

सध्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर निक जोनासचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर खाली पडला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या आवडत्या गायकाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. निक त्याच्या चाहत्यांसमोर परफॉर्म करत होता. निक हातात माइक घेऊन गाणे म्हणत होता. त्यामुळेच तो मागे सरकताना अचानक पडतो. मात्र, या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi ???? (@jerryxmimi)

कॉन्सर्टदरम्यान भावूक झाली प्रियांका चोप्रा
याआधी जोनास ब्रदर्सने शनिवारी न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कॉन्सर्टमध्ये निक जोनासची पत्नी आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा देखील सहभागी झाली होती. जिथे निकचा परफॉर्मन्स पाहून ती भावूक झाली. प्रियांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये निक स्टेजवर परफॉर्म करत होता. दुसरीकडे, प्रियंका त्याला पाहून भावूक झाली आणि तिचे अश्रू पुसताना दिसली. (While performing, Priyanka’s husband Nick Jonas fell from the stage, the video went viral)

अधिक वाचा-
शिल्पाने बूट घालून तिरंगा फडकवल्याने चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात; म्हणाले, ‘…नाटक करत नको जाऊ’
मन सुन्न करणारी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचे कमी वयात निधन, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा