चेहरा आहे की चेष्टा! १.५ लाख रुपये देऊन मॉडेलने बदलला आपला लूक, जगातील सर्वात मोठे गाल

Model Anastasia Pokreshchuk World Biggest Cheeks Has Shared A Picture Before Cosmetic Surgeries


सेलिब्रिटी कधी कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध होतील याबाबत काही सांगता येत नाही. कधी ते आपल्या वेगळ्या ड्रेसमुळे, तर कधी ते आपल्या डान्समुळे प्रसिद्ध होतात. अशातच आता एक मॉडेल एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध झाली आहे. ते कारण वाचल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील. तिचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.

ही मॉडेल इतर कोणी नसून युक्रेनची अनास्तासिया पोक्रेशचुक ही मॉडेल आहे. विशेष म्हणजे ती आपले मोठे गाल आणि मोठ्या ओठांमुळे प्रसिद्ध झाली आहे. तिने हे रूप घेण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

अनास्तासिया ३२ वर्षांची असून तिला आपला लूक बदलण्यासाठी तब्बल ६ वर्षांचा कालावधी लागला. अनास्तानियाचा दावा आहे की, सर्जरीमुळे ती तिला इतके मोठे गाल मिळाले आहेत की, ते जगातील सर्वात मोठे गाल आहेत.

नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला थ्रो-बॅक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताच भलताच व्हायरल झाला. तिचा हा फोटो पाहून चाहतेही पुरते दंग झाले.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिचे गाल कसे दिसताचे, हे तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. केवळ गाल आणि ओठच नाही, तर तिचे गुलाबी केस, डोळ्यातील लेन्स आणि मेकअपही चाहत्यांना आकर्षित करत आहे.

अनास्तासिया पोक्रेशचुकने आपला चेहरा बदलण्यासाठी २,१०० डॉलर म्हणजेच जवळपास १.५ लाख रुपये खर्च केले आहेत. तिने आपल्या शरीरात केलेले बदलही ती अनेकदा इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

 

तरीही, सोशल मीडियावरील युजर्स तिची थट्टा उडवत आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, तिने आपला चेहरा बिघडवला आहे. द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, एनस्तासिया २६ वर्षांची असताना तिने आपले पहिले फेशियल फिलर केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १४’ रनरअप राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, चाहत्यांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-मालदीवमध्ये साराचे ऑरेंज बिकिनीमध्ये हॉट आणि बोल्ड फोटोशूट, नजर हटणार नाही असा फोटो!

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा


Leave A Reply

Your email address will not be published.