यशराज फिल्म्सची मोठी घोषणा, ‘हे’ चार बिग बजेट चित्रपट होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित


नुकतेच सरकारने राज्यभरातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह खुली करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे भारतात टाळेबंदी लागली होती, त्यामुळे सगळी चित्रपटगृह बंद होती. अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. याचा परिणाम थिएटर मालिकांवर आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना झाला आहे. त्यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक निर्माते त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची वाट बघत होते. अशातच आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सने त्यांच्या आगामी चार चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

आदित्य चोप्राचे ‘बंटी और बबली २’, ‘पृथ्वीराज’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘शमशेरा’ हे चार मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्याने घोषित केली आहे. ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात सैफ आली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित शर्वरी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण वी. शर्मा करत आहेत. (Yashraj films announce release dates of their four big budget films)

यशराज फिल्म्सचा आणखी एक मोठा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार राजा पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांची बायोपिक आहे.

सुपरस्टार रणवीर सिंग आणि शालिनी पांडे यांचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ मध्ये काम केलेली अभिनेत्री शालिनी पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगची भूमिका खूप मजेशीर असणार आहे. या चित्रपटात तो एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘शमशेरा’ या चित्रपटात हे तिघेही दिसणार आहेत. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ब्रदर्स’ आणि ‘अग्निपथ’ फेम करण मल्होत्रा यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट


Leave A Reply

Your email address will not be published.