बॉलिवूड कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांची पर्सनल लाईफ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काहीवेळा त्यांना यामुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोची सातत्याने चर्चा होत आहे. त्याचवेळी काही युजर्स तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत.
अभिनेत्री एवलिनने तुषान भिंडीसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर एवलिनने स्वत:ला अभिनयापासून दूर केले आहे. त्याचवेळी २०२१ च्या नोव्हेंबरमध्ये तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. सध्या एवलिन आपल्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, एवलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मुलीला दूध पाजताना दिसत आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की, एवलिन तिच्या लहान मुलीला दुध पाजताना कॅमेऱ्याकडे पाहत हसत आहे. या क्षणाचा ती किती आनंद घेत आहे हे स्पष्टपणे जाणवू शकते.
अनेक चाहत्यांना एवलिन शर्माचा हा फोटो खूप आवडला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक युजर्स यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. या फोटोवर कमेंट करताना युजर्स म्हणाले की, “असा फोटो शेअर करण्याची काय गरज आहे.” एका युजरने लिहिले की, “पण बहिण घरातील वस्तू म्हणजेच वैयक्तिक गोष्टी घराबाहेर पसरू देऊ नको.” तर तिथे एका युजरने लिहिले की, “जगातील सर्वात खास भावना.” एका युजरने लिहिले की, “बेबी खूप क्यूट.”
एवलिन एक जर्मन मॉडेल आहे. ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. एवलिनने २००६ मध्ये टर्न लेफ्ट या अमेरिकन चित्रपटातून पदार्पण केले. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून एवलिनने बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. एवलिनने रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर एवलिन ‘नौटंकी साला’, ‘यारियां’, ‘मैं तेरा हीरो’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘हिंदी मीडियम’, ‘जॅक एंड जिल’, ‘साहो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
एवलिन शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र ती बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवू शकली नाही. एवलिनने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग आणि कॅमिओ भूमिकाही केल्या आहेत. कामातून ब्रेक घेऊन एवलिन सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
हेही वाचा :