‘अधुरी प्रेम कहाणी आता होणार पूर्ण’, म्हणणारी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ मालिका घेणार निरोप?


पूर्वी मालिका म्हणजे फक्त घरातील महिलांच्या मनोरंजनाचे एक साधन समजले जायचे. मात्र काळ बदलला तशा पूर्वी महिलांपुरता मर्यादित असणाऱ्या मालिका घरातील सर्वांच्याच मनोरंजनाचे साधन बनल्या. मालिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. प्रेक्षकांना मालिकांची जणू सवयच लागून जाते. रोज विशिष्ट वेळेत मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा दिनक्रम बनतो. मालिकांमध्ये येणारी विविध वळणं प्रेक्षकांचा उत्साह टिकवून ठेवतात. सध्याच्या घडीला प्रेक्षकांची सर्वांत आवडती मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली असून, स्वीटू आणि ओमची प्रेम कहाणी सर्वांनाच भावली.

स्वीटू आणि ओमची प्रेमकहाणी लग्नापर्यंत पोहचली होती. त्यांचे लग्न होणार यामुळे प्रेक्षक तुफान खुश होते, मात्र इथेच मालिकेने मोठे आणि अनपेक्षित वळण घेतले आणि स्वीटूचे लग्न ओम ऐवजी मोहितसोबत झाले. या ट्रॅकमुळे सर्वच मालिका प्रेमींचा भ्रमनिरास झाला आणि मालिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यानंतर मालिकेत अनेक वळणं आली. मोहित आणि मालविकाचे सत्य समोर आले. स्वीटूने मोहीतला घटस्फोटाचे कागदपत्रं देऊन कारवाई सुरु केली. आता सध्या या मालिकेचे नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रोमोंमध्ये ‘अधुरी प्रेम कहाणी आता होणार पूर्ण’ असे दाखवले जात असून, स्वीटू आणि ओमचे मिलन आणि त्यांचे लग्न दाखवले जाणार आहे.

मालिकेत आलेल्या या मोठ्या वळणामुळे आणि प्रोमोंमधून, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय अशी चर्चा आता रसिकांमध्ये सुरु झाली आहे. मालिकेचे प्रोमो देखील तशाच स्वरूपाचे असल्याने कोणालाही बघितल्यावर असे वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र आता यासर्वांमधे प्रेक्षक सर्वांत जास्त स्वीटू आणि ओमच्या लग्नासाठी जास्त उत्सुक असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!