Saturday, September 30, 2023

कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये पाहिले अच्छे दिन, पण आता कुणी करतंय नोकरी तर कुणी झालंय गृहीणी

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे कधी आले आणि कधी गेले हे हे कळालंच नाही. अनेक जण बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्यासाठी मेहनत घेतात, संघर्ष करतात. परंतु काही जणांच्या नशिबीच चांगल्या चित्रपटात एक चांगली भूमिका साकारण्याची संधी असते. अनेक जण त्या संधीचं सोनं करतात पण काही जणांना ते सोनं टिकवता येत नाही तर काही ते स्वतःहून गमावतात. नव्वदीच्या दशकात असे बरेचसे कलाकार होते ज्यांना आपण अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये पाहिलं परंतु अचानक ते इंडस्ट्रीमधून कुणी तरी जादू केल्याप्रमाणे गायब झाले. असे कोणते कलाकार बॉलिवूडमध्ये येऊन गेले आणि ते सध्या काय करत आहेत हेच आपण पाहणार आहोत.

जुगल हंसराज

जुगल हंसराज यांनी बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. शेखर कपूर यांच्या १९८३ साली आलेल्या मासुम मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी नसिरुद्दीन शाह यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी झुठा सच, सल्तनत, कर्मा यासारखे आणखीन काही चित्रपट केले. यानंतर त्यांनी पापा कहते है, मोहब्बते यासारख्या हिट सिनेमांमधून मुख्य भूमिका साकारली परंतु हवं तसं यश त्यांना अजूनही मिळालं नाही. सध्या ते अमेरिकेत बॉलिवूड न्यूज शो या टीव्ही कार्यक्रमाचं निवेदन करतात. या सोबतच ते लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेत.

किमी काटकर

किमी काटकर ही ८० आणि ९० च्या दशकात एक बोल्ड अभिनेत्री होती. तिने बरीच आयकॉनिक गाणी बॉलीवूडला दिली आहेत. किमीने त्या काळात हम, जैसी करनी वैसी भरनी, गैर कानुनी, मेरा लहू, तेजा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. किमीने लग्नानंतर स्वत: ला चित्रपटांपासून दूर केलं. सध्या ती आपल्या कुटुंबासमवेत ऑस्ट्रेलियामध्ये राहतेय.

मयुरी कांगो

पापा कहते है या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगोदेखील लाइमलाइटपासून दूर आहे. ती होगी प्यार की जीत, बादल आणि बेताबी या चित्रपटात दिसली होती. २०१९ मध्ये अशी बातमी आली की मयुरी गूगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून काम करते. तेव्हाच्या आणि आताच्या मयुरीच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे.

जस अरोरा

नव्वदीच्या दशकाचा आणखी एक लोकप्रिय चेहरा जस अरोरा आहे. त्याच्यावर चित्रित केलेलं ‘गुर नलो इश्क मीठा’ हे गाणं आपल्याला आठवत असेल त्या काळातील सर्वात देखणा अभिनेता जस हा नुकताच धरती का वीर योद्धा पृथ्वीराज या मालिकेत दिसला होता. या शिवाय त्याने फ्रिकी अली, चलते चलते, एक पहेली लीला या आणि अशा अनेकkimi katkar सिनेमांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

ममता कुलकर्णी

बॉलिवूड सेन्सेशन असणाऱ्या ममता कुलकर्णीने करण अर्जुन आणि बाजी यांच्यासह अनेक हिट चित्रपटांमधून मुख्य भूमिका साकारल्या. ममताची गणना बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये होते. तीचं नाव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ते ड्रग्ज तस्कर विक्की गोस्वामी यांच्याशी जोडलं गेलं होतं. विकी गोस्वामीबरोबर ती दुबई आणि केनियामध्ये होती. विकी तस्करीमुळे तुरूंगात गेला. यानंतर ममता बॉलिवूडपासून दूर गेली आणि अध्यात्मात लीन झाली. सध्या ती केनिया या देशातच वास्तव्यास आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही सुपरस्टार झालो…” बाईपण भारी देवा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वंदना गुप्तेंनी व्यक्त केल्या भावना
‘टॅलेंटमुळे काम मिळालंय, सोशल मीडिया…’, अभिनय करिअरच्या संघर्षावर ‘आनंदी’चे परखड मत

हे देखील वाचा