DDLJ: ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’, चित्रपटाला २६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलने शेअर केली खास पोस्ट

सुपरहिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ प्रदर्शित होऊन २६ वर्षे झाली, पण त्याची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. १० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. शाहरुख खान, काजोल आणि अमरीश पुरी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि काजोलने इतका दमदार अभिनय केला की, ते भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अजरामर झाले.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/shemaroo

हा चित्रपट रोमँटिक होता. पण कुटुंब, विधी, वडील-मुलगा यांच्यातील बदलते नातेसंबंध, वडील-मुलीचे नाते, प्रेम, अभिव्यक्ती आणि प्रियकर-प्रेयसी यांचे मिलन सुंदर रूपाने रुपेरी पडद्यावर चित्रित केले गेले. काजोलने चित्रपटाला २६ वर्ष पूर्ण झाल्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या शेवटच्या सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये अमरीश पुरी काजोलचा हात घट्ट धरून उभे आहेत. मग ते काजोलचा हात सोडून म्हणतात, “जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी …” या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले आहे की, “सिमरनने २६ वर्षांपूर्वी ट्रेन पकडली आणि आम्ही अजूनही सर्व प्रेक्षकांचे या प्रेमाबद्दल आभार मानत आहोत.”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

चित्रपटाचे व्हिडिओ एडिटर केशव नायडू यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘डीडीएलजे’ हा चित्रपट प्रत्येक बाबतीत चमकदार होता. मग ते अभिनय असो किंवा दिग्दर्शन, पटकथा असो किंवा संगीत, किंवा परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण. याशिवाय, स्विझरलँडमधील गवताळ प्रदेश आणि पंजाबच्या मोहरीच्या शेतांनीही चित्रपटात भर घातली आहे.

नायडू म्हणाले होते की, त्यांना चित्रपटातील तो सीन खूप आवडला, जेव्हा सिमरन राजला सांगते की, ती अशा व्यक्तीशी लग्न करणार आहे. ज्याला ती कधी भेटली नाही किंवा पाहिलही नाही. नायडू म्हणाले की, “हा सीन शानदार होता कारण तो खूप चांगला चित्रित केला गेला होता. तेथूनच मी दीवाना झालो. मला समजले की, हे दोघे पुढे जाण्यासाठी खूप चांगले काम करणार आहेत, विशेषतः काजोल. तिने अप्रतिम अभिनय केला. शाहरुख देखील त्याच रंगात दिसला ज्यासाठी तो नेहमी ओळखला जात असे.”

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. याशिवाय तिचा ‘त्रिभंगा’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सध्या ती आता ‘द लास्ट हुर्रे’ या चित्रपटाचा एक भाग आहे. त्याबद्दल अद्याप बरेच तपशील उघड झालेले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

Latest Post