Sunday, April 19, 2026
Home अन्य धक्कादायक! ‘नॅशनल’ क्रश रश्मिका मंदानाला कन्नड इंडस्ट्रीने केले बॅन, कारण ऐकून तुम्हालाही बसेन धक्का

धक्कादायक! ‘नॅशनल’ क्रश रश्मिका मंदानाला कन्नड इंडस्ट्रीने केले बॅन, कारण ऐकून तुम्हालाही बसेन धक्का

दाक्षिणात्य सुंदरी आणि अवघ्या भारताची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आपल्या दमदार अभिनयासबोतच आपल्या सुंदरतेने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. मात्र नुकतंच अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिला कन्नड इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यात आले आहे.

लोकप्रिय अभिनेत्री रशमिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने आपल्या दमदार अभिनयाने साउथच नाही तर बॉलिवडवमध्येही छाप सोडली आहे. ‘पुष्पा: द राइज‘ या चित्रपाटामध्ये तिच्या श्रीवल्लीच्या भूमिकेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली असून अभिनेत्रीने यशाचे शिखर गाठले आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीला सतत कोणत्याना कोणत्या कारणामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र, यामुळे याचा प्रभाव रश्मिकाच्या करिअरवर पडला आहे.

झाले असे की, काही दिवसांपूर्वी रश्मिकाला विनातळावरुन येत असताना पॅपराजींनी  एक प्रश्न वितचारला होता की, रिषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित ‘कातारा’ हा चित्रपट पाहिला आहे का?’ यावर अभिनेत्रीने उत्तर देत सांगितले होते की, “आतापर्यत तर नाही पण लवकरच बघणार आहे.” रश्मिकाच्या अशा वक्तव्यामुळे तिला प्रेक्षकांनी वादाच्या घेऱ्यात घेरले आहे. ‘अभिनेत्रिने कन्नड चित्रपटांची शून्य किंमत ठेवली आहे’, असा नारा कन्नड चित्रपट प्रेमिंनी तिच्या विरोधात  लावला आहे. त्यासोबतच ‘अभिनेत्रीला कन्नड मातृभाषेविषयी काहीच आत्मियता आणि सन्मान नाही’, असेही म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

सांगायचे झाले तर रशमिकाने आपल्या करिअरची सुरुवात कन्नडमधील परमाहा यांच्या प्रोडक्शन हाउसमधून केली होती. यानंतर अभिनेत्रीची लोकप्रियता वाढली आणि तिला पुढील चित्रपाटंमध्ये काम मिळाले. मात्र, कन्नड चित्रपटप्रेमींच्या मते रश्मिकाच्या मनात कन्नड चित्रपटाविषयी आणि मायभाषेविषयी सन्मान राहिला नाही त्यामुळे अभिनेत्रीला कन्नड इंडस्ट्रीमधून बॅन करण्यात आले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
खुशखबर! ‘चंद्रमुखी 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूडमधील ‘ही’ अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका
अरे अरे मै तो गया रे! टीना दत्ता परतल्याने शालिन भनोटला आश्चर्याचा धक्का…

हे देखील वाचा