शाहरुख खान स्टारर पठाणचं वेड चाहत्यांसोबतच बॉलिवूड कलाकारांनाही लागलं आहे. चित्रपटाने तब्बल 700 कोटींचा गल्ला जमवला आहे पण अजूनही थिएटरमध्ये पठाण पाहाण्यासाठी गर्दी पाहायाला मिळत आहे. अशातच अभिनेत्री रेणुका शहाणे आणि पती आशुतोष राणा हे एकत्र पठाण पाहाण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. त्यांनी सोशल मीडियावरही काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांसोबतच शाहरुखचंही लक्ष वेधलं आहे.
पठाण (Pathan) चित्रपटामध्ये शहारुख खान (Shahrukh Khan), अभिनेत्री दीपिका पादुकोण (Dipeeka Padukone), जॉन अब्राहम (John Abraham) शिवाय रेणुका शहाणे (Renuka Shahane)चे पती म्हणजेच अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी देखिल कर्नल लूथराची भूमिका निभावली आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रेणुका एकदम ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी गाडीमध्ये बसू एकत्र सेल्फी आहे. अभिनेत्रीने हे फोटो ट्वीटरवर शेअर करत भन्नाट कॅप्शनमध्ये लिहिले की, “शेवटी पठाण पाहायला जात आहे. मौसमही ठिक आहे. खुर्शीची पेटीही बांधली आहे…कर्नल लूथरासोबत.”
अभिनेत्रीच्या या ट्वीटने चाहत्यांसोबतच शाहरुखचंही लक्ष वेधलं असून त्यानेही रंजक गोष्ट सांगितली आहे, जी 1989 च्या सर्कस शो मध्ये काम केलं होतं. किंग खानने अभिनेत्रीची मस्करी करत लिहिले की, “तुम्ही कर्नल लूथरांना सांगितलं आहे का तुम्ही माझी पाहिली हिरोइन आहात? नाहीतर आपण याला टॉप सिक्रेट ठेवूयात, नाही तर ते मला त्यांच्या एजन्सीमधून काढून टाकतील”
Col Luthraji ko bataya aapne ki aap meri pehli heroine hain!! Or should we keep it a Top Secret otherwise he may fire me from the agency!!! https://t.co/GsCj5h0vC2
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 5, 2023
अभिनेत्री सध्या 56 वयाच्या असुन त्यांनी शाहरुखला चोख उत्तर देत लिहिले की, “त्यांच्याशी कोणती गोष्ट लपून राहाते? तुम्हीच त्यांना या अंतरयामी म्हटलं आहे. काहीही झालं तरी ते तुम्हाला फायर कुरु शकत नाही, कारण जे काम तुम्ही करत आहात ते दुसरं कोणी करुच शकत नाही.” यांच्या चॅटिंगवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याशिवाय अनेक चाहते यांच्यामध्ये होणाऱ्या संवादाचा आनंदही घेत आहे.
Hahaha unsey koi baat chhupti kahaan hai? Aaphi ne unhe antaryaami kahaa hai ???? aur chaahey jo ho jaaye, woh aapko fire nahi kar saktey kyunki jo kaam aap kartey hain woah koi aur nahi kar saktaa ???????????? https://t.co/D3JitHzCzg
— Renuka Shahane (@renukash) February 5, 2023
ट्वीटरवर जेव्हा शाहरुखला चाहत्यांनी आशुतोष राणा यांच्याबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्याने सांगितले होते की, ठते शानदार अभिनेत्या सोबतच ज्ञानी आणि अंतरयामी आहेत.” तेव्हा अभिनेत्रीने शाररुखसाठी लिहिले होते की, “तुम्ही दयाळु आणि खरे आहात.” सांगायचं झालं तर पठाणमध्ये 57 वर्षाच्या शाहरुखने रॉ एजंटची भूमिका निभावली आहे तर 55 वर्षाच्या आशुतोष यांनी रॉ ज्वाइंट सेक्रेटरीची भूमिका निभावली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्ननांनतर ‘हे’ कपलही बांधणार साता जन्माच्या गाठी, गोवामध्ये थाटामाटात पार पडणार विवाहसोहळा
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या तारखेत बदल, ६ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ दिवशी कपल अडकणार विवाहबंधनात