Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हनिमूनला गेलेल्या अभिनेत्रीने तब्बल 1800 रुपयांची खाल्ली मॅगी, पती हसत म्हणाला…

नागिन‘ आणि ‘ये है मोहब्बतें‘ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेली कृष्णा मुखर्जी आजकाल पती चिराग बाटलीवालासोबत सेशेल्समध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. अभिनेत्री तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून तिच्या हनिमून ट्रिपची झलक सतत दाखवत आहे. अशात एके ठिकामी कृष्णाने  महागडी मॅगी खाल्ल्याने अभिनेत्रीचा पती तिची खिल्ली उडवत आहे. काय आहे नेकमे प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरे तर, कृष्णा मुखर्जी (krishna mukherjee) हिने पती चिरागसोबत सेशेल्सला पोहोचताच पहिले जेवणाचा आनंद लुटला. अभिनेत्रीने फर्स्ट मीलसाठी मॅगीची ऑर्डर दिली. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करून तिच्या ब्रंचची झलकही दाखवली. व्हिडिओमध्ये चिराग महागडी मॅगी ऑर्डर केल्याबद्दल कृष्णाची खिल्ली उडवताना दिसत आहे. इतकंच नाही तर हनिमूनसाठी परदेशात गेलेल्या कृष्णाने जेवणासाठी वेस्टर्न डिशऐवजी आलू-पुरीची ऑर्डर दिली असल्याने, त्यावर चिरागने तिची खिल्ली उडवली आहे.

krishna mukherjee
Photo Courtesy: Instagram/krishna_mukherjee786
krishna mukherjee
Photo Courtesy: Instagram/krishna_mukherjee786

कृष्णा मुखर्जीने तिच्या पतीसोबतच्या हनीमूनचे अनेक रोमँटिक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. या दरम्यान, अभिनेत्रीने शॉर्ट स्पोर्ट वियरसह तिच्या बांगड्या फ्लॉंट केल्या आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

कृष्णा मुखर्जीने 13 मार्च 2023 रोजी बंगाली आणि पारशी रितीरिवाजांनुसार चिरागशी लग्न केले होते. गोव्यात झालेल्या या जोडप्याच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अनेक टीव्ही स्टार्सनी धुमाकूळ घातला. अभिनेत्रीच्या पतीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, चिराग हा नौदलाचा अधिकारी आहे, ज्याला अभिनेत्रीने जवळपास एक वर्ष डेट केले.(tv actress krishna mukherjee eat maggie worth 1800 her husband chirag batliwalla mocked her)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खरे की काय? गुपचूप लग्न केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला बाबा? दोन महिन्याचे झाले बाळ

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

हे देखील वाचा