Sunday, September 8, 2024
Home भोजपूरी खेसारी लाल यादवला होणार अटक? ‘या’ कारणामुळे कोर्टाने केले अजामीनपात्र वॉरंट जारी

खेसारी लाल यादवला होणार अटक? ‘या’ कारणामुळे कोर्टाने केले अजामीनपात्र वॉरंट जारी

भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे. 18 लाख रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भोजपुरी गायक आणि अभिनेता खेसारी लाल यादव यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश छपरा न्यायालयाने दिले आहेत. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग प्रियांशू शर्मा यांनी रसुलपूर पोलीस ठाण्यातील एनआय अॅक्ट खटला क्रमांक 2676/23 मधील खटला क्रमांक 120/19 मध्ये हा आदेश दिला आहे.

यामध्ये प्रसिद्ध गायक आणि भोजपुरी कलाकार ​​खेसारी लाल यादवचे (Khesari Lal Yadav ) नाव घेण्यात आले आहे. तो रसूलपूर पोलीस ठाण्याच्या धनाडीह गावचा रहिवासी आहे. त्याचे नाव आरोपी म्हणून समावेश करण्यात आले आहे. त्याचे बाँड रद्द करत अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याआधी आरोपी खेसारी लाल यादव याने न्यायालयात हजर राहून जामीन घेतला होता. मात्र गेल्या अनेक तारखांपासून खेसारी न्यायालयात तो हजर झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी योग्य पद्धतीने होत नव्हती.

रसुलपूर पोलीस ठाण्याच्या अशनी गावातील रहिवासी मृत्युंजयनाथ पांडे यांनी याप्रकरणी 16 ऑगस्ट 2019 रोजी रसुलपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. त्यात त्यांनी खेसारी लाल यादव यांची पत्नी चंदा देवी हिच्यासोबत खरेदी केलेली जमीन विकण्यासाठी 22 लाख 7 हजार रुपयांना सौदा केल्याचे म्हटले होते. त्याची रजिस्ट्रर नोंदनी 4 जून 2019 रोजी करण्यात आली होती.

रोख रकमेच्या बदल्यात खेसारी लाल यादव यांना 18 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. जो त्याने 20 जून 2019 रोजी त्याच्या खात्यात जमा केली. हा चेक 24 जून रोजी परत आला. 27 जून रोजी त्याने पुन्हा पैसे जमा केले, त्यानंतर बँकेने 28 जून 2019 रोजी चेक बाऊन्स झाल्याची माहिती दिली. यामुळे त्यांनी ही एफआयआर दाखल केला.

खेसारी लाल विषयी बोलायच झाले तर, खेसारी लाल हा भोजपुरीमधील एक लोकप्रिय गायक आहे, खेसारी लालने अनेक गाणी गायली आहेत. त्याच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत असतात. त्याने ‘बस कर पगली’, ‘सज के सवर के’, ‘जुदाई’, ‘अपनी तो जैसे तैसे’ यांसारखी गाणी गायली आहेत. (Arrest warrant issued for Bhojpuri actor Khesari Lal Yadav)

अधिक वाचा- 
‘बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्‍यात’ अडकला की…’; सेक्सविषयी किरण मानेंनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांच्या १०० व्या जयंती दिनी पंतप्रधानांनी ट्विट करत काढले गौरवोद्गार म्हणाले…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा