Saturday, September 30, 2023

‘बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्‍यात’ अडकला की…’; सेक्सविषयी किरण मानेंनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

आजकालची तरूण पिढी सेक्स या विषयावर उघडपणे मत मांडण्यास नकार देते. अनेकादा महिलांबाबतीत असो किवां सेक्सविषयी असो बोलण टाळले जाते. याच कारण अद्यापही समोर आलेले नाही. पण काही लोक अशी आहेत या विषयावर अगदी बिधास्तपणे बोलतात. असेच विविध विषयांवर मत मांडणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे किरण माने होय. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या खाजगी आयुष्यबद्दल आणि सामाजिक प्रश्नांबद्दल मत मांडत असतात. नुकतीच त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने (Kiran Mane) यांनी सेक्सविषयी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंंट करत असतात. किरण माने यांनी आता केलेल्या पोस्टवर अनेकांनी आपले मत व्यक्त केल आहे.

किरण माने यांनी पोस्ट करताना लिहिले की, “‘सेक्सची भूक’… ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं.. एकवेळ ‘बाटली’तनं मानूस सहज भायेर पडंल, पन बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्‍यात’ अडकला की त्याच्या ‘नशिबानं थट्टा मांडली’च म्हनून समजा.” तसेच किरण माने यांनी पुढे संत तुकाराम महाराजांना अभंग लिहिला आहे. ही पोस्ट करताना तुका आशेचा किरण असा हॅशटॅग किरण माने यांनी वापरला आहे.

दरम्यान, किरण माने यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेतील विलासरावची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे देखील खूप चर्चेत आले होते. आता किरण माने आगामी ‘सिंधुताई…माझी माई’ या मराठी मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Kiran Mane’s Facebook post about sex is in discussion on social media)

अधिक वाचा –
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांच्या १०० व्या जयंती दिनी पंतप्रधानांनी ट्विट करत काढले गौरवोद्गार म्हणाले…
लवकरच आई होणाऱ्या स्वरा भास्करने तिचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केले बेबी बंप फ्लॉन्ट, नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा