Tuesday, June 24, 2025
Home मराठी साखर वाटा! ‘मुलगी झाली हो’मधील ‘ही’ अभिनेत्री थाटणार संसार; प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत घेणार सात फेरे

साखर वाटा! ‘मुलगी झाली हो’मधील ‘ही’ अभिनेत्री थाटणार संसार; प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत घेणार सात फेरे

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेडिंग आहेत. यातील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांना खास आवडत असल्याचे दिसते. मालिकेत नुकतेच माऊ आणि शौनकचा लग्नसोहळा पार पडला आहे. मागील अनेक दिवसांपासून सगळेजण त्यांच्या लग्नाची वाट बघत होते. परंतु अनेक संकटांचा सामना करून त्यांनी त्यांचे प्रेम सिद्ध केले. नुकतेच मालिकेत थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. अशातच या मालिकेतील एक अभिनेत्री देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेत माऊच्या वहिनीच्या भूमिकेत असणारी आर्या म्हणजेच अभिनेत्री श्वेता अंबिकर ही विवाहबंधनात अडकणार आहे.

नुकतेच श्वेताचे केळवण झाले आहे. तिने अजूनही लग्नाची तारीख जाहीर केली नाही, परंतु आता तिच्या घरात लग्नाची गडबड सुरू झालेली दिसत आहे. ती तिचा बॉयफ्रेंड आणि लेखक दिग्दर्शक अमेय गोरेसोबत लग्न करणार आहे. अमेय होतकरू बालकलाकारांसाठी ट्री-थिएटर अकादमी देखील चालवतो. शिवाय त्याचे शिवतीर्थनगर, कोथरूड येथे केक शॉप देखील आहे. तिच्या लग्नाची बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसेच आता तिच्या लग्नाची सगळेजण वाट पाहत आहेत. (Mulgi zali ho actress shweta anbikar will soon get engaged)

श्वेताने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेव्यतिरिक्त ‘माझे मन तुझे झाले’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘बाजी’, ‘तू माझा सांगाती’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

तसेच तिने ‘गोंद्या आला रे’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील तिचे आर्या नावाचे समंजस आणि शांत स्वभावाचे पात्र प्रेक्षकांना खास आवडते. या पात्राला सगळ्यांची खूप पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

हे देखील वाचा