Saturday, August 8, 2026
Home मराठी ‘मी कसाये हे तुम्हाला माहितीये, कलाविश्वातील जातवर्चस्ववाद मला ठेचायचाय आणि ही लढाई आता सुरु झालीये’

‘मी कसाये हे तुम्हाला माहितीये, कलाविश्वातील जातवर्चस्ववाद मला ठेचायचाय आणि ही लढाई आता सुरु झालीये’

स्टार प्रवाह (Star Pravah) या मराठी वाहिनीवर प्रसिद्ध होणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील कलाकार अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी शुक्रवार (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली.

मुलगी झाली हो, या मालिकेत ‘विलास पाटील’ हे पात्र साकारणाऱ्या किरण माने यांना मालिकेच्या व्यवस्थापकांनी विनासुचना कामावरुन काढून टाकले. माने यांची अचानक हकालपट्टी झाल्यानंतर आणि ही बाब समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर किरण माने विशेष चर्चेत आले होते. त्यामुळे माने स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि काही खुलासे करण्याठी पत्रकार परिषद घेणार का? असे विचारले जात होते. त्याच अनुषंगांने किरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी काही महत्वाचे खुलासे केले. (Marathi Actor Kiran Mane Press Conference at Mumbai Press Club)

काय म्हणाले किरण माने?

वकील असिम सरोदे यांच्यासोबत किरण माने यांनी मुंबई प्रेस क्लब (Mumbai Press Club) येथे पत्रकार परिषद घेतली ज्यात बोलताना किरण मानेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी जे मुद्दे मांडले ते खालीलप्रमाणे.,

  • मला अचानक कामावरुन काढून टाकण्यात आले. दोन दिवस गप्प राहिल्यानंतर प्रोडक्शन हाऊसने तिसऱ्या दिवशी कारण सांगितलं. यातील पहिल्यापेक्षा दुसरं कारण गंभीर होतं. जे म्हणजे महिलांशी असभ्य गैरवर्तन केले, असं कारण सांगितलं.
  • यातूनच माझ्याविरोधात वेगळं कारस्थान रचण्याचा डाव करण्यात आल्याचे दिसत आहे.
  • तसेच या संपूर्ण प्रकरणातील अनेक गोष्टी संशयास्पद आहे. म्हणूनच अनेक गोष्टींसाठी आता विचार करावा लागेल.
  • यातील प्रमुख म्हणजे प्रोडक्शन हाऊस, चॅनेल, डिरेक्टर यांची हांजी हांजी कलाकाराला करावी लागू नये, यासाठी काम करावं लागेल.
  • माझ्या स्पष्ट आणि तिरकस राजकीय भुमिका घेणे, हेच कारवाईमागील मुख्य कारण असावे, अशी शंका घेण्यास आता पूरेपूर वाव आहे.
  • सिने / कलाक्षेत्रातील भेदभाव यावर किरण माने;

– जातवर्चस्ववाद सध्या सिनेक्षेत्रात आहे

– मराठी कलाक्षेत्रात विशेषतः नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये जातवर्चस्ववादाची पकड आहे. यांची संख्या नगण्य आहे, पण पकड मजबूत आहे.

– पण हे मुठभर जातवर्चस्ववादी ठेचायला वेळ लागणार नाही

– मला माझ्या क्षेत्रातील हा प्रकार नाहीसा करायचा आहे, असेही माने म्हणाले

– मला ब्राह्मणद्वेष्टा ठरवण्यात आलंय पण तसं नाही.

– तसेच, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या स्वप्नातील आणि संविधानात अपेक्षित केलेलं राज्य आपण बनवूयात.

– खरं म्हणजे, माझ्या कामाचं चॅनेल प्रोड्युसिंग हेडने कौतुक केलं म्हणून माझ्याविरोधात एक झुंड तयार झाला, त्यांनी हे काम केलं.

पॅनारोमा एंटरटेंन्मेंट प्रोडक्शन हाऊस विरोधात भाष्य

ज्या वाहिनीत किरण माने काम करत होते ती स्टार प्रवाह आणि ज्या मालिकेत काम करत होते, त्या मालिकेचे प्रोडक्शन हाऊस म्हणजेच पॅनारोमा एंटरटेंन्मेंट प्रोडक्शन हाऊस याविरोधात किरण माने यांनी काही मागण्या केल्या आहेत.

– पॅनारोमा एंटरटेंन्मेंट प्रोडक्शन हाऊसने माझी माफी मागावी

– मला 5 कोटी नुकसान भरपाई द्यावी (माझ्या घरात अनेक अडचणी सुरु आहेत, माझे वडील आजारी आहेत, घरात हाल सुरु आहेत)

– पॅनारोमा एंटरटेंन्मेंट प्रोडक्शन हाऊसचा करारा स्टार प्रवाह वाहिनीने रद्द करावा

अधिक वाचा – ‘किरण माने यांना ५ कोटी नुकसान भरपाई द्या आणि लेखी माफीसह…’, पत्रकार परिषदेत किरण मानेंच्या वकिलांची मागणी

मला अगोदरच अंदाज आला होता – माने

६-७ जानेवारी रोजी स्टार प्रवाहच्या अधिकृत पेजवर किरण मानेंना काढून टाका ही मागणी करण्यात आली. जे काम काही ट्रोलर्सने केले. मात्र, ते ठरवून होतंय असं मला अंदाज आला होता. त्यामुळे भविष्यात काही होईल याचा अंदाज आलाय.

– आता आम्ही नोटीस पाठवलीये… १०-१५ दिवसांचा अवधी आहे किंवा आम्ही वाट पाहणार आहोत. नंतर न्यायालयीन लढाई करणार.

हेही वाचा – ‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पायजे, ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल!’ किरण मानेंची पोस्ट चर्चेत

संपूर्ण प्रकरण काय?

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं, जे त्यांच्या अभिनयाने घराघरात पोहचलं. या मालिकेच्या पात्राबरोबरच किरण माने हे सातत्याने समाजमाध्यमांवर अनेक विषयांवर मुद्देसुदपणे व्यक्त होतात. तसेच त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे बऱ्याचदा ते चर्चेत राहिलेत. मात्र, त्यांच्या स्पष्ट राजकीय भुमिकांमुळेच त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच, याबाबत त्यांना कुठलीही पूर्वसुचना देण्यात आली नव्हती.

हेही वाचा – राजकीय भुमिका घेतल्याने अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी? सोशल मीडियावर संतापाची लाट

त्यानंतर समाजमाध्यमांवर सर्वच क्षेत्रातून किरण माने यांच्यावर झालेल्या कारवाईचा निशेष करण्यात आला. पुढे जाऊन माने यांच्याविरोधात सहकलाकार महिलेने तक्रार केली त्यानंतर त्यांनी काढण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, माने यांनी ते नाकारत आपल्याविरोधात पद्धतशीरपणे कट कारस्थान रचून आपली हाकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले. तसेच, आपण घेतलेल्या स्पष्ट राजकीय भुमिका हेच याला कारण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. (Actor Kiran Mane Removed From Mulgi Zali Ho Serial Of Star Pravah)

अधिक वाचा –

हे देखील वाचा