बॉलिवूडचे जग खूप मोठे आणि रंगीबेरंगी आहे. ज्याच्या चकाकीत काही कलाकार चमकतात तर काही हरवून जातात. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर आणि मनावर आपली छाप सोडली आहे. ज्यांच्या नावाने चाहते आपला व्यवसाय पुढे नेऊ पाहतात. त्याचबरोबर अनेक गोष्टींना कलाकारांच्या नावावरून नावेही देण्यात आली आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, खाद्यपदार्थांची नावे देखील तुमच्या आवडत्या कलाकारांच्या नावाने आहेत. होय, ही गोष्ट खरी आहे. चला तर मग या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
रजनीकांत
प्रेक्षक दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना त्यांची स्टाईल आणि दमदार अभिनयासाठी ओळखतात. अभिनेत्याचे देशभरात करोडो चाहते आहेत, जे त्यांना ‘थलायवा’ म्हणून ओळखतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, चेन्नई शहरातील रजनीकांत यांच्या नावावर असलेल्या ‘न्यू नीला भवन’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये एक नाही तर १२ डिशेस उपलब्ध आहेत.

दीपिका पदुकोण
बॉलिवूडमधील डिंपल गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) स्मितहास्य आणि लूकचे लाखो चाहते वेडे आहेत. पण तिच्या नावाचा एक पराठा महाराष्ट्रातील पुण्यात मिळतो. एवढेच नाही, तर देशाबरोबरच परदेशातही अमेरिकेतील ऑस्टिन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये या अभिनेत्रीच्या नावावर डोसा ठेवण्यात आला आहे.

रणबीर कपूर
कपूर कुटुंबाचा दिवा आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नावाने पंजाबची राजधानी ‘चंदीगड’ येथील एका ढाब्यावर खास चिकन मिळते. विशेष म्हणजे रणबीरही त्याच्या ‘राजनीती’ या राजकीय नाटकाच्या प्रमोशनसाठी तिथे गेला होता.

शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरुख खान‘ची (Shah Rukh Khan) ख्याती देशभरात पसरली आहे. त्याचा पुरावा म्हणजे एकदा बनारसमध्ये ज्या दुकानातून त्यांनी पान खाल्ले होते ते दुकान त्यांच्या नावावर पान विकू लागले. जवळपासच्या लोकांना ते दुकान शाहरुख खानच्या पान दुकानाच्या नावानेच माहीत आहे.

प्रियांका चोप्रा
या यादीत ग्लोबल आयकॉन बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) नावाचाही समावेश आहे. प्रियांकाच्या नावाचा एक मिल्कशेक वेस्ट हॉलिवूडमधील मिलियन्स ऑफ मिल्कशेक्स स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

सलमान खान
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘भाईजान’ नावावर त्याच्या एका चाहत्याने एक संपूर्ण रेस्टॉरंट उघडले आहे. ज्यामध्ये त्याने साकारलेल्या पात्रांच्या नावावर डिशेसची नावेही ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा –










