अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्नाचा (Twinkle Khanna) पेट डॉग ‘क्लियो’ याचे निधन झाले आहे. या दोघांनी याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. ‘क्लियो’चे काही फोटो शेअर करताना त्यानी भावनिक पोस्ट लिहली आहे. ट्विंकलने तिच्या अकाउंटवरून लिहिले आहे की, १२ वर्षाच्या वयात क्लियोच्या निधनानंतर एकाच वेळी मन जड आणि रिकामे वाटत आहे. हे जोडपं क्लियोला खूप प्रेम करत होते आणि काहीवेळा क्लियोचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असायचे.
व्हिडिओ शेअर करत ती लिहिते की, “आमच्या सुंदर क्लियोचे आज निधन झाले आहे. आम्ही त्याच्यासोबत १२ वर्ष घालवले. मला माहित नव्हतं की, एकाच वेळी मन जड आणि रिकामं वाटणं काय असतं. पण आज असंच वाटत आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत ती क्लियोची तपकरी फर घासताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत क्लियो गवतावर लोळताना आणि खेळताना दिसत आहे.
ट्विंकलच्या चुलत भावाने देखील दु:ख व्यक्त कले आहे. सोनाली बहलनेही यावरती प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, “ओह नो.”. बॉबी देओलनेही (Bobby Deol) तुटलेल्या हृदयाची ईमोजी शेअर करत दु:ख व्यक्त कले आहे. अमृता अरोरा (Amruta Arota), डब्बू रत्नानीनेही (Dabbu Ratnani) दु:ख व्यक्त कले आहे.
एका युजरने लिहिले आहे की, “तुमच्या या घडलेल्या प्रसंगावर दु:ख वाटत आहे. एकदा जीव लावला की, त्याच्याशिवाय राहु शकत नाही. ते आपल्या जीवनाचा घटक बनुन जातात.” दुसऱ्या युजरने लिहिले, “मजबूत राहा कारण कोणत्याही प्रिय व्यक्तीचे जाण्याने खूप दु:ख वाटते.” अक्षय कुमार नेही क्लियोच्या निधनावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने दोन फोटो शेअर करत लिहिले आहे की, “असे म्हणतात की, कुत्रे आपल्या हृदयावर पंजाच्या खुणा सोडतात. तुम्ही आज आमच्या हृदयचा भाग घेतला. RIP क्लियो, मला तुझी आठवन येईल.”
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा
- The Kashmir Files | ‘…म्हणून कपिल शर्माने फिल्म प्रमोशनला दिला नकार’, विवेक अग्निहोत्रींचा धक्कादाय खुलासा
- ‘कोणालाच बनायचं नव्हतं सलमान खानची बहीण’, बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल स्वरा भास्करचा खुलासा
- १९व्या वर्षात लग्न झालेली ‘अंगूरी भाभी’ आता आहे १४ वर्षाच्या मुलीची आई, मुलीच्या संस्काराबद्दल सांगितला ‘मंत्र!’