Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आश्रम ३’ फेम अभिनेत्रीने हद्दच केली पार, काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये वाढवले सोशल मीडियाचे तापमान

‘जन्नत २’, ‘कमांडो २’, ‘रुस्तम’ यासारख्या सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता होय. ईशा मोठ्या पडद्यावर जितकी बोल्ड भूमिका साकारते, तितकीच हॉट ती खऱ्या आयुष्यातही आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताच, चाहते पुरते घायाळ होऊन जातात. तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. अशातच तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या पोझ पाहून पाहणाऱ्याच्याही भुवया उंचावतील.

काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ईशा गुप्ताचा जलवा
अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस असलेल्या या ड्रेसमध्ये ती जितकी सुंदर दिसत आहे, तितकीच चर्चा तिच्या हॉटनेसचीही रंगली आहे. तिच्या रिव्हिलिंग गाऊन आणि लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. यामुळेच तिचे फोटो पोस्ट होताच तुफान व्हायरल होतात.

मोस्ट डिझायरेबल वुमेन बनली ईशा गुप्ता
ईशा गुप्ताला नुकताच मोस्ट डिझायरेबल वुमेन ऑफ द इअरचा पुरस्कार मिळाला. याचा आनंद तिने इंस्टाग्राममार्फत चाहत्यांसोबत शेअर केला. ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. ईशाच्या या फोटोला आतापर्यंत ३ लाख ७० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ३ हजारांहून अधिक कमेंट्सचा वर्षावही तिच्या या पोस्टवर झाला आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकजण या पुरस्कारासाठी तिचे अभिनंदन करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) 

‘आश्रम ३’मधील भूमिकेने जिंकली सर्वांची मने
अलीकडेच ईशा गुप्ता ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. ज्यामध्ये बॉबी देओलसोबतच्या तिच्या बोल्ड स्टाइलने खूप चर्चेत आणले आहे. ‘आश्रम ३’मधील तिची भूमिका फार मोठी नसली, तरी ती खूप महत्त्वाची आणि मजबूत होती, त्यामुळे तिने सर्वांची मने जिंकली.

अशात आता अशी बातमी आहे की, ईशा गुप्ता ‘हेरा फेरी ३’मध्ये दिसणार आहे, पण या सिनेमाच्या शूटिंगला उशीर होत आहे. याशिवाय तिच्याकडे सध्या कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही, पण तरीही स्टाईलने लाईमलाइटमध्ये कसे राहायचे हे  ईशाला चांगलेच माहीत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा