Saturday, June 15, 2024

सलमान खानच्या ‘अंतिम’ सिनेमाने केली दमदार कमाई, जाणून घ्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

उत्सुकता निर्माण झाली. सिनेमाचे प्रमोशन देखील जोरदार चालू होते, किंबहुना अजूनही चालू आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद देत त्याचे जोरदार स्वागत केले आहे. पहिल्यांदाच ‘अंतिम’ सिनेमाच्या निमित्ताने सलमान खान आणि आयुष्य शर्मा अर्थात खऱ्या आयुष्यातील जीजा साल्याची जोडी एकत्र दिसत आहे. या सिनेमात सलमान एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. अतिशय शांत डोक्याचा पोलीस ऑफिसर त्याने साकारला आहे. हा पोलीस अधिकारी अजिबात रंगाच्या भारत निर्णय घेत नाही. ‘अंतिम’ हा सिनेमा शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला असून, या सिनेमाने कमाईच्या बाबतीत हळूहळू वेग पकडायला सुरूवात केली आहे.

सलमान आणि आयुषच्या अंतिम सिनेमाने २९ नोव्हेंबर रोजी ३ कोटींच्या आसपास व्यवसाय केला आहे. याच गणिताचा विचार केला तर या सिनेमाने चार दिवसांमध्ये २१ कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. २८ नोव्हेंबरला रविवारी सिनेमाच्या कमाईमध्ये ३०/४० टक्क्यांची घसरण दिसून आली. आता नवीन आठवडा सुरू झाला असून, वीक डेज असल्याने चित्रपटाच्या कमाईवर नक्कीच फरक पडेल. मात्र प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा सिनेमा चांगला व्यवसाय करेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. तसे पहिले तर सलमान खानचा सिनेमा म्हटल्यावर तो २५ ते ३० कोटी रुपयांची ओपनिंग नक्कीच घेतो. पण ह्या खेपेला हा स्पीड जरा कमी आहे.

‘अंतिम’ सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सर्वांनाच आयुष शर्माचा रफ अँड टफ लूक आणि ऍक्शन पाहायला मिळत आहे. सिनेमाचे संवाद, ऍक्शन सीन, सलमान आणि आयुषचा अंदाज, चित्रपटातील गाणी लोकांना तुफान आवडत आहे. अनेकांनी तर सलमानची या सिनेमातील भूमिका अतिशय वेगळी आणि लक्षवेधी असल्याचे देखील सांगितले आहे.

‘अंतिम’ या सिनेमात सलमान खान आणि आयुष शर्मासोबतच सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका असून, या सिनेमातून महिमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. महिमा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून, सलमान खानने सिनेमाची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा