पहिल्या दिवशी ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, जॉनची सिंगल स्क्रीनवर धूम


बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) अभिनित ‘सत्यमेव जयते २’ (Satyameva Jayate 2) गुरुवारी (२५ नोव्हेंबर) चित्रपटगृहात दाखल झाला आहे. जॉनशिवाय दिव्या कुमार खोसला या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘सत्यमेव जयते’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सत्यमेव जयते २’ बद्दल सांगायचे झाले, तर या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे आणि बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे.

पहिल्या दिवसाची कमाई
मल्टिप्लेक्सऐवजी सिंगल चित्रपटगृहात या चित्रपटाला अधिक प्रेक्षक मिळत आहेत. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाईटनुसार, ‘सत्यमेव जयते २’ ने पहिल्या दिवशी ३ कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी जॉन आणि चित्रपट निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाला विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशाच्या सिंगल चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो, याकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत.

भारतात २५०० स्क्रीन्सवर झाला प्रदर्शित
हा चित्रपट भारतात २५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट परदेशात १००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘सत्यमेव जयते’चे लाईफटाईम कलेक्शन ८० कोटी होते. हा चित्रपट त्याला मात देऊ शकेल की, नाही हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वात मोठी अडचण
‘सत्यमेव जयते २’ समोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सलमान खानचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून सलमान खान दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत कमाईच्या बाबतीत सर्वात जास्त नुकसान ‘सत्यमेव जयते २’ चे होऊ शकते.

वीकेंडचा फायदा
मात्र, शनिवार आणि रविवारी वीकेंडला चित्रपट चांगली कमाई करू शकतो. त्यामुळे शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवारीही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. हा वीकेंड ‘सत्यमेव जयते २’ साठी फायदेशीर ठरू शकतो. या चित्रपटात जॉन अब्राहम दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Latest Post

error: Content is protected !!